मिठाईतील दुकानांमध्ये कमी रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 05:36 PM2020-10-14T17:36:27+5:302020-10-14T17:36:37+5:30

नवरात्रीनिमित्ताने मिठाई विक्रेते पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करत आहेत.

There will be less railchail in the sweet shops | मिठाईतील दुकानांमध्ये कमी रेलचेल

मिठाईतील दुकानांमध्ये कमी रेलचेल

Next

कल्याण : लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद आणि अनलॉकमध्ये दुकानांना ग्राहक पाठ दाखवत असल्याने व्यापाऱ्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. यात मिठाई विक्रेत्यांचे हाल झाले आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मिठाईचा गोडवा कमी झाला आहे, अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली. 

मागील सहा महिन्यात कोरोनाच्या संकटाने सर्वांचे धाबे दणाणले आहेत. कोणालाही उत्साहाने सण देखील साजरा करता आले नाही. याचा थेट परिणाम,  बाजारातील अर्थचक्रावर पडला. दरवर्षी गणेशोत्सवात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र यंदा मिठाईच्या व्यवसायाला उतरती कळा लागली.

नवरात्रीनिमित्ताने मिठाई विक्रेते पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करत आहेत. उपवासाची मिठाई विक्रेते बनविण्याच्या कामाला सुरुवात करणार आहेत.  मिठाई बाजारात स्टॉबेरी काजू, बटर स्कॉच, चॉकलेट काजू, चॉकलेट, गुलकंद काजू, केशर मावा, मॅगो , डायफ्रुट  याप्रकारातील आणि अनेक चवीमध्ये बर्फी, पेढे उपलब्ध आहेत.  यासह मोतीचुर लाडू, सुपर लाडू, कडक लाडू, नरम बुंदी लाडू, महा लाडू, रवा लाडू, बेसण लाडू, चुरमा लाडू विक्रीस आहेत. तसेच काजू कतरी, पेढे, बदाम, अंजीर, पिस्ता, मलई बर्फी, नारळी पाक  या मिठाई नेहमीप्रमाणे दुकानात ठेवण्यात आल्या आहेत. 

मिठाई विक्रेता हरिश भदोरिया यांनी सांगितले की, गणेशोत्सवात व्यवसायाला मोठा फटका बसला. नवरात्री आणि दिवाळी या दोन सणांमध्ये व्यवसाय होईल, अशी आशा आहे. ग्राहक काही प्रमाणात दुकानात येत आहेत. ग्राहकांना उपवासाचे लाडू, मिठाई उपलब्ध आहे. 

Web Title: There will be less railchail in the sweet shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे