भिवंडीतील आगीत चार खोल्या जळाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 19:18 IST2018-01-23T19:15:27+5:302018-01-23T19:18:40+5:30

There were four rooms burnt in the fire in the Bhiwandi | भिवंडीतील आगीत चार खोल्या जळाल्या

भिवंडीतील आगीत चार खोल्या जळाल्या

ठळक मुद्देबंद खोलीतून आज दुपारी धुर आणि आगीच्या ज्वाळा निघाल्याने परिसरांत घबराटघटनास्थळी चार खोल्या जळून खाक झाल्या.

भिवंडी : शहरात कोटरगेट भागातील दाट लोकवस्तीत आज दुपारी २ वाजता लागलेल्या आगीत चाळीतील चार खोल्या जळून भस्मसात झाल्या.
कोटरगेट भागातील अब्दुल गफार यांच्या चाळीतील एका बंद खोलीतून आज दुपारी धुर आणि आगीच्या ज्वाळा निघाल्याने परिसरांत घबराट पसरली. माजली.लोकांनी ताबडतोब मनपाच्या अग्निशामक दलास पाचारण केले.परंतू तिनबत्ती येथील मंगळवारचा आठवडा बाजार व अरूंद रस्त्याने झालेली वहातूक कोंडी यामुळे आग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. दरम्यान घटनास्थळी चार खोल्या जळून खाक झाल्या.आगीचे कारण समजू शकले नाही.या चाळीत एकुण दहा खोल्या असुन त्या बंद अवस्थेत आहेत.या चाळीच्या चारही बाजूला इमारती झाल्या आहेत. बंद खोल्यांमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असुन या जागेवर विकासकांचा डोळा आहे,अशी माहिती परिसरांतील नागरिकांनी दिली.मात्र आगीचे कारण पोलीसांनी अजून स्पष्ट केले नाही.घटनास्थळी तहसिल कार्यालयांतील तलाठी व महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने भेट दिली.
 

Web Title: There were four rooms burnt in the fire in the Bhiwandi