शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सभेला गर्दी नसल्याने प्रकाश आंबेडकरांचा काढता पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 06:45 IST

कार्यकर्ते उन्हात ताटकळत; वंचित आघाडीच्या नेत्यांची सारवासारव

ठाणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा गुरुवारी ठाण्यात आयोजित केली होती. त्यासाठी ते ठाण्यात आलेही होते; परंतु सभास्थळी जाण्याचे टाळून त्यांनी थेट मुंबईकडे उड्डाण केले. तब्येतीचे कारण देऊन त्यांच्या नेत्यांनी सारवासारव केली असली, तरी प्रत्यक्षात सभास्थळी गर्दीच झाली नसल्याने त्यांनी त्याठिकाणी जाणे टाळल्याची माहिती समोर आली आहे.बुधवारी बदलापूरमध्ये आंबेडकर यांची सभा होती. परंतु, त्यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारल्याने त्याठिकाणी सभा झाली नाही. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी जाणूनबुजून त्यांना परवानगी नाकारल्याचा आरोप केला होता. त्यानंतर, गुरुवारी सायंकाळी ४ वाजता शिवाजी मैदान येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांना हेलिकॉप्टरसाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार ते ४.३० च्या सुमारास ठाण्यात आले. त्यानंतर त्यांनी थेट हॉटेल गाठले. तेथे फ्रेश होऊन ते सभास्थळी पोहोचणार होते. त्यानुसार, सभास्थळी इतर पदाधिकाऱ्यांची भाषणे सुरू करण्यात आली होती. परंतु, शिवाजी मैदान हे अत्यंत छोटे असतानाही तेसुद्धा कार्यकर्त्यांनी न भरल्याने आंबेडकरांनी सभास्थळी जाणे टाळून हेलिकॉप्टरने थेट मुंबईच्या दिशेने उड्डाण केले.

आंबेडकर येणार म्हणून उन्हातान्हात १०० ते १५० कार्यकर्ते त्यांची वाट पाहत होते. थोड्याच वेळाने त्यांचे आगमन होईल, असे पदाधिकाऱ्यांकडून वारंवार सांगितले जात होते. त्यामुळे आपल्या नेत्याचे भाषण ऐकण्यासाठी आलेले कार्यकर्ते उन्हाची पर्वा न करता ताटकळत बसले होते. अखेर, सभा साडेसहाच्या सुमारास संपली, तरीसुद्धा ते आलेच नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते कंटाळून तेथून निघाले. आंबेडकरांची तब्येत ठीक नसल्याने ते मुंबईकडे रवाना झाल्याचे कारण यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर