मुंब्रा शिळफाटा येथील खान कंपाउंडमधील गोडावूनला लागलेल्या आगीमध्ये ६ गोडावून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 04:37 PM2020-01-07T16:37:32+5:302020-01-07T16:37:54+5:30

मुंब्रा शिळफाटा येथील खान कंपाउंडमधील गोडावूनला  सोमवारी रात्री २ च्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये ६ गोडावून जाळून खाक झाले आहेत.

There has been a fire in Godavoon in the Khan compound in Thane | मुंब्रा शिळफाटा येथील खान कंपाउंडमधील गोडावूनला लागलेल्या आगीमध्ये ६ गोडावून खाक

मुंब्रा शिळफाटा येथील खान कंपाउंडमधील गोडावूनला लागलेल्या आगीमध्ये ६ गोडावून खाक

Next

ठाणे: मुंब्रा शिळफाटा येथील खान कंपाउंडमधील गोडावूनला  सोमवारी रात्री २ च्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये ६ गोडावून जाळून खाक झाले आहेत. प्लास्टिक, भंगार,चिंधी आणि पुट्ट्यांची ही सर्व गोडावून होते . रात्री २ च्या सुमारास आग लागल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती वावस्थापन कक्षाला मिळाल्यानंतर त्वरित घटनास्थळी अग्निशमन विभागाचे पथक आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक दाखल झाले. त्यानंतर गोडावूनला लागलेली आग पहाटे ५ च्या सुमार पूर्णपणे विझवण्यात आली. मात्र कुलिंगची प्रक्रिया मंगळवारी दुपार पर्यंत सुरु होती. 

समशेर खान यांचे ५० बाय २० फुटांचे प्लास्टिक आणि भंगारचे गोडावून होते. अहमद अली यांचे ११ बाय ५० फुटांचे चिंधीचे दुकान होते . मोहम्मद अक्रम शाह यांचे १५ बाय ५० फुटांचे बॅटचे गोडावून होते . रफिक अहमद यांचे ९० बाय २० फुटाचे भंगारचे दुकान होते तर गुलाब यांचे ५० बाय २० आणि ५० बाय १५ फुटांची अशी दोन पट्ट्यांचे गोडावून होते . या सर्व गोडावून मालकांची घरे जाळून खाक झाली आहे . 

गोडावून अनेक महिन्यांपासून या ठिकाणी असून ही आग नेमकी कशामूळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही . मात्र या गोडावूनमध्ये वीज घेण्यासाठी वायर असुरक्षित पद्धतीने घेण्यात आल्या असून त्यामुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे . या आगीची नोंद डायघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .

Web Title: There has been a fire in Godavoon in the Khan compound in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.