शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

...तर जिल्ह्यातील काँग्रेस अध्यक्षांची होणार उचलबांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पूर्णपणे कमकुवत झालेली आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभा, लोकसभा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पूर्णपणे कमकुवत झालेली आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभा, लोकसभा अथवा महापालिकांच्या निवडणुका लढवायच्या असतील तर सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. याची जबाबदारी तेथील अध्यक्षांवर असणार आहे. परंतु, त्यांच्याकडून काम योग्य झाले नाही, तर त्यांची उचलबांगडी केली जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. ‘लढाई हौसले से लढी जाती है.. हत्यारों से नहीं’ असे सांगून त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पटोले राज्यातील विविध जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकी घेत आहेत. त्यानुसार बुधवारी सायंकाळी उशिरा ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली होती. या बैठकीला ठाणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे, प्रदेश सदस्य राजेश जाधव, नईम खान, महेंद्र म्हात्रे, शिल्पा सोनाने, शिरीष घरत, शेखर पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी ठाणे जिल्ह्यात काँग्रेस कमकुवत असल्याची खंत पटोले यांनी व्यक्त केली. परंतु, ठाणे शहरात काँग्रेसचे काम हे बऱ्यापैकी सुरू असल्याने त्यानुसार जिल्ह्यातील इतर ठिकाणीदेखील अशी बांधणी गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

* ठाणे शहर काँग्रेसला बळकटी द्या

ठाण्याबाबत आता गटातटाचे राजकारण संपले असले तरी काँग्रेसचे श्रेष्ठी सांगतील त्यानुसार शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलने असतील किंवा इतर कामांमध्ये कार्यकर्त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. मात्र, शहर काँग्रेसला श्रेष्ठींकडून बळकटी मिळत नसल्याची खंत या वेळी काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पक्षाने मागील ३८ वर्षे आम्हाला काहीच दिले नाही, ना तलवार दिली, ना ढाल, ना बळ दिले आणि लढ म्हणतात. आम्ही कसे लढायचे, असा सवाल काही पदाधिकाऱ्यांना केला. इतर पक्षातील मंडळी काँग्रेसच्या जीवावर मोठी झाली. मधल्या काळात पुर्णेकरांचा वॉर्ड विकला गेला, मुंब्रा विकला गेला. त्यामुळे हे कुठे तरी थांबणे गरजेचे असल्याचे मतही या वेळी व्यक्त करण्यात आले. त्यानंतर यापुढे असे होणार नसल्याचे सांगून पटोले यांनी पक्षाकडून संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.

फोटो - ठाणे काँग्रेस.