मंदिरातून मातेची मूर्ती व दानपेटीत रक्कमेची चोरी, अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: November 23, 2023 17:01 IST2023-11-23T17:00:58+5:302023-11-23T17:01:31+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-३, शहाड फाटक येथे प्रसिद्ध भवानी माता मंदिर आहे.

मंदिरातून मातेची मूर्ती व दानपेटीत रक्कमेची चोरी, अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
उल्हासनगर : कॅम्प नं-३ सी ब्लॉक रोड शहाड फाटक येथील भवानी माता मंदिरातून मंगळवारी पितळीची मातेची मूर्ती व दानपेटीतील रोख रक्कम चोरी झाली. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३, शहाड फाटक येथे प्रसिद्ध भवानी माता मंदिर आहे. मंगळवारी मध्यरात्री एका अल्पवयीन मुलाने मंदिरात प्रवेश करून मंदिरातील दुर्गा मातेची अंदाजे ४ किलोची पितळी मूर्ती व दानपेटीतील रोख रक्कम चोरून नेल्याचे उघड झाले. मंदिरातून मातेची मूर्ती चोरीला गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरेच्या मदतीने चोरी केल्याच्या घटनेचा छडा लावला असून एका अल्पवयीन मुलावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.