भिवंडीत घरातील अर्धा किलो सोन्याच्या दागिन्यांची चोरी

By नितीन पंडित | Updated: February 10, 2024 18:54 IST2024-02-10T18:53:41+5:302024-02-10T18:54:37+5:30

तक्रारीवरून कोनगाव पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

Theft of half a kilo of gold jewelery from a house in Bhiwandi | भिवंडीत घरातील अर्धा किलो सोन्याच्या दागिन्यांची चोरी

भिवंडीत घरातील अर्धा किलो सोन्याच्या दागिन्यांची चोरी

भिवंडी: तालुक्यातील कोनगाव येथे वृध्द महिलेच्या घरातील सुमारे अर्धा किलो सोन्याचे दागिने चोरीची घटना उघडकीस आली आहे.कोनगाव येथील वक्रतुंड सोसायटी या इमारतीच्या तळमजल्यावर वरील खोलीत ६४ वर्षीय श्रीमती सुमन भगवान कराळे या एकट्या राहत होत्या.

या ठिकाणी २५ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या दरम्यान त्यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक कोणीतरी अज्ञात चोरटयाने उघडून घराच्या बेडरूमधील लोखंडी कपाट उघडून कपाटा मधील ३० लाख ८० हजार रुपये किमतीचे ५६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घरात घुसून चोरी करून नेल्याचे लक्षात आल्याने वृध्द महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Theft of half a kilo of gold jewelery from a house in Bhiwandi