गास येथील बंगल्यात चोरी; लाखोंचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 23:35 IST2019-02-14T23:35:00+5:302019-02-14T23:35:11+5:30
पश्चिमेकडील गास गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यात घरी कोणी नसताना दिवसाढवळ्या मोठी चोरी झाल्याची घटना घडल्याने गावातील बंगले मालकांमध्ये दहशत पसरली आहे.

गास येथील बंगल्यात चोरी; लाखोंचे दागिने लंपास
नालासोपारा : पश्चिमेकडील गास गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यात घरी कोणी नसताना दिवसाढवळ्या मोठी चोरी झाल्याची घटना घडल्याने गावातील बंगले मालकांमध्ये दहशत पसरली आहे. नालासोपारा पोलिसांनी अज्ञात चोरांविरोधात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.
नालासोपारा शहराच्या पश्चिमेकडील गास गावातील मुख्य रस्त्यावरील उच्चभ्रू वस्तीतील व्यवसायिक जेरोम डायगो रु माव (५५) यांच्या मालकीच्या "जीवनसाथी" बंगल्यात बुधवारी ९.३० ते ४.३० दरम्यान कोणी घरी नसतांना चोरांनी मागच्या दोन दरवाजाने प्रवेश करून बेडरूममधील कपाटातून ३ लाख रु पये किमतीच्या १० तोळे वजनाच्या ६ बांगड्या, १ लाख ८० हजार रु पये किंमतीचे ६ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १ लाख ८० हजार रु पये किंमतीचे प्रत्येकी ३-३ तोळे वजनाचे २ सोन्याचे हार, ४५ हजार रु पये किमतीच्या १५ ग्रॅम वजनाचे कानातील ३ जोड सोन्याच्या रिंगा, ४५ हजार रु पये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि १५ हजार रु पये किंमतीचा लॅपटॉप असे एकूण ७ लाख ६५ हजार रु पये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि १ लॅपटॉप चोरून नेला आहे. या बंगल्यात घरामध्ये कोणी नसतांना ही चोरी करण्यात आली आहे. बंगल्याच्या आजूबाजूने जर सीसीटीव्ही लावलेले असते तर चोर त्यात कैद झाले असते किंवा ही चोरी झाली नसती.