मीरारोड मधील मुलांच्या हॉस्टेलमध्ये चोरी; मोबाईल, दोन लॅपटॉप चोरीला 

By धीरज परब | Updated: January 5, 2023 18:26 IST2023-01-05T18:25:45+5:302023-01-05T18:26:32+5:30

नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

Theft at a children's hostel in Miraroad; Mobile, two laptops stolen | मीरारोड मधील मुलांच्या हॉस्टेलमध्ये चोरी; मोबाईल, दोन लॅपटॉप चोरीला 

मीरारोड मधील मुलांच्या हॉस्टेलमध्ये चोरी; मोबाईल, दोन लॅपटॉप चोरीला 

मीरारोड - मीरारोड पूर्व येथे व्हि. जे. व्हि. जैन मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांचे मोबाईल व दोन लॅपटॉप हॉस्टेल मधून चोरीला गेले आहेत. नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

या हॉस्टेलमध्ये राहणारे विध्यार्थी हे एन. एल. दालमिया कॉलेज येथे एम.बी.ए.चे शिक्षण घेत आहेत. त्याकरिता ते हॉस्टेलमध्ये राहतात. सौरभ दिग्रजा सह मिहीर, अभिषेक हे तिघे एकत्र हॉस्टेलच्या खोलीत राहतात. २ जानेवारी रोजी पहाटे सहा वाजता सौरभ व मिहीर असे कॉलेजचा प्रोजेक्ट करुन झोपले. त्यांनी खोलीचा दरवाजा बंद केला नव्हता. दुपारी १२ वा झोपेतून उठले असता उशी जवळ ठेवलेला मोबाईल त्यांना मिळून आला नाही. तसेच टेबलवर ठेवले दोघांचे लॅपटॉप देखील जागेवर नव्हते. 

त्यांनी घडलेला प्रकार हॉस्टेलचे वॉर्डन महेंद्र यांना सांगितला असता त्यांनी हॉस्टेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात सकाळी साडेसातच्या दरम्यान एक अनोळखी इसम रिकाम्या हाताने हॉस्टेलचे इमारतीत प्रवेश करत असल्याचे व काही वेळाने तो इसम हातात बॅग घेवुन बाहेर जात असल्याचे दिसून आले. त्या इसमा बाबत हॉस्टेलच्या अन्य लोकांना विचारले असता तो कोणाच्या ओळखीतला नसल्याचे लक्षात आले. त्या अनोळखी चोराच्या विरोधात १ मोबाईल व २ लॅपटॉप चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटने मुळे हॉस्टेलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 
 

Web Title: Theft at a children's hostel in Miraroad; Mobile, two laptops stolen