चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला तलावात ढकलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 07:46 IST2022-07-29T07:45:32+5:302022-07-29T07:46:00+5:30

पतीसह तिघांना अटक : उरणमधील घटना

The wife was pushed into the lake due to suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला तलावात ढकलले

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला तलावात ढकलले

लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला तलावात ढकलून ठार मारल्याची हृदयद्रावक घटना उरण पोलीस ठाण्यातील हद्दीतील जांभुळपाडा येथे  घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पतीसह अन्य दोघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.

उरण तालुक्यातील जांभुळपाडा कातकरी वाडीत आरोपी समाधान कातकरी (३५) हा आपली पत्नी विजया कातकरी (३४) हिच्यासोबत राहतो.  वैवाहिक जीवन सुखाचे सुरू असतानाच पत्नीचे इतर कुणाशी तरी अनैतिक संबंध असल्याच्या संशयाने समाधानला पछाडले होते. त्याने २४ जुलैला पत्नीला तलावात ढकलून पोबारा केला होता. २६ जुलैला पत्नी विजयाचा मृतदेह तलावाच्या पाण्यावर तरंगताना दिसला. त्यानंतर समाधानच्या दोन्ही भावांना या घटनेची कोणतीही कल्पना नसल्याने त्यांनी मृतदेह पुरून विल्हेवाट लावली. याप्रकरणी पेणमध्ये राहणाऱ्या आरोपीच्या मेहुण्याला कुणकुण लागल्याने त्यांनी पेण पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली होती. पेण पोलिसांनी उरण पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हा गंभीर प्रकार उघड झाला. पोलिसांनी आरोपी समाधान व मृतदेहाची विल्हेवाट लावणारे नवनाथ कातकरी, गजानन कातकरी या तिघांना अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Web Title: The wife was pushed into the lake due to suspicion of character