शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 05:40 IST

Mumbra Train Accident: मुंब्रा स्टेशनजवळील ‘त्या’ वळणावर कोणताही तांत्रिक किंवा संरचनात्मक धोका नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वळण बदलण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही, कारण तेथे जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण आहे.

मुंबई  -  मुंब्रा स्टेशनजवळील ‘त्या’ वळणावर कोणताही तांत्रिक किंवा संरचनात्मक धोका नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वळण बदलण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही, कारण तेथे जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण आहे. तपास समितीकडून अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच तो सादर होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंब्रा स्थानकाजवळील वळणावर विशेष चाचणी घेण्यात आली. यावेळी दोन ट्रेन ७५ किमी प्रतितास वेगाने चालवण्यात आल्या व त्यातील अंतराचे मोजमापही घेण्यात आले. या चाचणीत कोणताही धोका आढळून आला नाही.

या वळणाची रचना नियमानुसारच या वळणाची रचना नियमानुसारच करण्यात आली असून, या भागात लोकलच्या गतीची मर्यादा १०५ किमी प्रतितास आहे. गर्दीच्या वेळेत रोज १८० हून अधिक लोकल या मार्गावर एकमेकांना क्रॉस करतात, तरीही अशा घटना क्वचितच घडतात. मुंबई विभागात मुंब्य्राच्या तुलनेत अधिक तीव्र वळण असलेली ठिकाणेही आहेत, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

१५ डब्यांची लोकल लवकरच धावणारमध्य रेल्वेने अधिक सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी १५ डब्यांच्या लोकलची संख्या वाढवण्याचे काम गतीने सुरू केले आहे. सध्या जलद आणि धिम्या मार्गांवर ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने काम प्रगतिपथावर आहे. काही तांत्रिक व भौगोलिक अडचणी असूनही रेल्वे प्रशासन त्या दूर करून जास्त क्षमतेच्या गाड्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेcentral railwayमध्य रेल्वे