Thane: बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:46 IST2025-09-05T15:46:33+5:302025-09-05T15:46:33+5:30
Thane Crime : पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे पत्नीला कळले. पती गर्लफ्रेंडला भेटायला गेल्याचे कळले आणि पत्नी लॉजवर जाऊन धडकली. त्यानंतर जे घडलं ते चक्रावून टाकणार आहे.

Thane: बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण...
extra marriage affair News: पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे पत्नीला कळले. त्यानंतर ती पतीवर नजर ठेवून होती. पती त्या महिलेला भेटायला लॉजवर गेला. त्याचवेळी पत्नीही तिथे पोहोचली. लॉजवर पती दुसऱ्या महिलेसोबत असताना पत्नीने रंगेहाथ पकडले. त्यानंतर पती पळून गेला आणि थेट ऐरोलीच्या खाडीत उडी मारली. त्याचा शोध घेण्यात आला, पण सापडला नाही. तो वाहून गेला आणि मेला असावा म्हणून शोध मोहीम थांबवण्यात आली. पण, तो जिवंत असल्याचे नंतर समोर आले.
ही घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्यात राहणारा आणि रिक्षा चालवणााऱ्या व्यक्तीचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध सुरू झाले. पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याची माहिती पत्नी कळली. तिने पतीवर पाळत ठेवण्यास सुरूवात केली.
लॉजवर पतीला रंगेहाथ पकडले
पतीवर पाळत ठेवून असतानाच बुधवारी पती त्या महिलेसोबत लॉजवर गेला असल्याची माहिती पत्नीला कळली. तिने लगेच लॉजकडे धाव घेतली. तिथे गेल्यानंतर तिला पती महिलेसोबत दिसला. महिलेने पतीला चांगलंच घेरलं.
लॉजवर झालेल्या प्रकारानंतर पती रात्री ऐरोलीच्या खाडी पुलाजवळ गेला. खाडी पुलावरून त्याने पत्नीला कॉल केला आणि माझी चूक झाली असल्याची कबुली दिली. त्यानंतर तो पत्नीला म्हणाला की, मी आता आत्महत्या करतोय.
शोध घेतला पण सापडला नाही, नंतर...
पत्नीला कॉल केल्यानंतर पतीने ऐरोलीच्या खाडी पुलावरून उडी मारली. त्यानंतर पत्नीने सगळ्या नातेवाईकांना सांगितले. पोलिसांनाही याबद्दल माहिती देण्यात आली. रबाळे पोलीस, ऐरोली अग्निशामक दल आणि नातेवाईकांनी त्याला दोन तास शोधले. तो वाहून गेला असावा म्हणून शोध थांबव्यात आला.
दरम्यान, गुरूवारी सकाळी खाडी पुलापासून काही अंतरावर एका तरुणाला गाळात अडकलेल्या अवस्थेत एक व्यक्ती दिसला. त्याने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी बोटीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढले. त्याची चौकशी केली. त्यावेळी ही माहिती समोर आली की, खाडी पुलावरून उडी मारणारा व्यक्ती तोच आहे.