Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:04 IST2025-06-02T22:07:53+5:302025-06-03T15:04:25+5:30

Thane Water Supply News: ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

Thane: TMC Announces 12-Hour Water Cut On June 4 Due To Pre-Monsoon Maintenance | Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद

Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद

Thane Water Cut:ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात येत्या ४ जून २०२५ रोजी १२ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पावसाळ्यापूर्वीच्या आवश्यक देखभालीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, ठाणे महानगरपालिकेने रहिवाशांना पाणी जपून वापरण्याचे  आवाहन केले आहे.

ठाणे महानगरपालिकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार,  "ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतील टेमघर जल शुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब उपकेंद्रातील पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक देखभाल, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी कामे बुधवारी (०४ जून २०२५) करण्यात येणार आहेत. त्यामुळे, बुधवारी सकाळी ९.०० ते रात्री ९.००  या काळात १२ तासांसाठी ठाणेकरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे."

'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद
घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिध्दांचल, समता नगर, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग येथे १२ तासासाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील. इतर भागात स्टेम प्राधिकरणामार्फत येणारा पाणी पुरवठा झोनिंग करुन सुरू ठेवण्यात येणार आहे.

Web Title: Thane: TMC Announces 12-Hour Water Cut On June 4 Due To Pre-Monsoon Maintenance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.