ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 20:46 IST2025-09-07T20:45:57+5:302025-09-07T20:46:58+5:30
घरात मुलीच्या लग्नाची तयारी सुरु असल्याने न्यायाधीश काळे या आपल्या मुलीसोबत खरेदीसाठी खाली उतरल्या होत्या.

ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
ठाणे - 12 बंगलो परिसरातील चैतन्य इमारतीत राहणाऱ्या ठाणे जिल्हा न्यायाधीश प्रज्ञा काळे यांच्या पहिल्या मजल्यावरील शासकीय निवासस्थानातील बेडरूममधील छताचा स्लॅब अचानक कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घरात मुलीच्या लग्नाची तयारी सुरु असल्याने न्यायाधीश काळे या आपल्या मुलीसोबत खरेदीसाठी खाली उतरल्या होत्या. घरात पती होते. परंतू, ते दुसऱ्या खोलीत टीव्ही पाहत असल्याने अनर्थ टळला.
कुठे पाणी मुरतेय...; ठाण्याच्या जिल्हा न्यायाधीश मुलीच्या लग्नाच्या तयारीसाठी बाहेर गेल्या तेवढ्यात... #Thane#DistrictCourt#SlabCollapse#PradnyaKalepic.twitter.com/C0A2wvXkVd
— Lokmat (@lokmat) September 7, 2025
या घटनेनंतर न्यायाधीश प्रज्ञा काळे यांनी स्वतः आपल्या पतीसह कोपरी पोलिस ठाण्यात धाव घेत सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), ठाणे यांच्या विरोधात अधिकृत तक्रार नोंदवली आहे.