ठिकऱ्या कोणाच्या उडतील हे ठाणेकर दाखवून देतील: एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 09:50 IST2025-10-20T09:50:26+5:302025-10-20T09:50:47+5:30
काेपरी भागातील अष्टविनायक चाैक येथे शनिवारी दिवाळी पूर्वसंध्या हा कार्यक्रम झाला.

ठिकऱ्या कोणाच्या उडतील हे ठाणेकर दाखवून देतील: एकनाथ शिंदे
लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : निवडणुकीचे घाेडामैदान जवळ आहे. त्यामुळे आगामी काळात ठिकऱ्या काेणाच्या उडतील, हे ठाण्यातील नागरिक दाखवून देतील, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात उद्धवसेनेसह विराेधकांना दिला. काेपरीतील दिवाळीनिमित्तच्या एका कार्यक्रमात ते बाेलत हाेते.
आगामी निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकणार असल्याचा दावाही शिंदे यांनी रविवारी ठाण्यात झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात केला. काेपरी भागातील अष्टविनायक चाैक येथे शनिवारी दिवाळी पूर्वसंध्या हा कार्यक्रम झाला.
याच कार्यक्रमावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी उद्धवसेनेवर टीका केली. दाेन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या, या खा. संजय राऊत यांच्या विधानावर शिंदे म्हणाले, ठिकऱ्या काेणाच्या उडतील, हे येणाऱ्या निवडणुकीतच नागरिक दाखवतील.