ठाण्यात ४५ फुटांची संरक्षण भिंत तीन गाड्यांवर पडली, कुणालाही दुखापत नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 11:42 AM2021-07-13T11:42:12+5:302021-07-13T11:42:55+5:30

वागळे इस्टेट, जुन्या पासपोर्ट ऑफिस जवळील अँफोटेक पार्कची सुमारे ४० ते ४५ फुटांची संरक्षण भिंत  व १ झाड सोमवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास   त्या भिंतीलगत उभ्या केलेल्या तीन आलिशान चारचाकी वाहनांवर पडले.

In Thane a protection wall fell on three vehicles no one injured | ठाण्यात ४५ फुटांची संरक्षण भिंत तीन गाड्यांवर पडली, कुणालाही दुखापत नाही 

ठाण्यात ४५ फुटांची संरक्षण भिंत तीन गाड्यांवर पडली, कुणालाही दुखापत नाही 

Next


ठाणे: वागळे इस्टेट येथे इमारतीच्या कंपाऊंडची ४० ते ४५ फुटांची संरक्षण भिंत आणि झाड परिसरात उभ्या केलेल्या तीन गाड्यांवर पडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

       वागळे इस्टेट, जुन्या पासपोर्ट ऑफिस जवळील अँफोटेक पार्कची सुमारे ४० ते ४५ फुटांची संरक्षण भिंत  व १ झाड सोमवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास   त्या भिंतीलगत उभ्या केलेल्या तीन आलिशान चारचाकी वाहनांवर पडले. यासंदर्भात माहिती मिळताच ठामपा आपत्ती आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत, गाड्यांवर पडलेले झाड कापून बाजूला केले. त्यातच रात्रीची वेळ आणि पाऊस सुरूच असल्याने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. 

२४ तासात ३७.३० मिमी पाऊस  
ठाणे शहरात गेल्या चोवीस तासांत ३७.३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच मंगळवारी सकाळपासून पाऊस पडत असल्याने दुपारपर्यंत सूर्यनारायणाचे दर्शन दुर्लभ झाले होते. तर आतापर्यंत शहरात १३०९.२६ मिमी नोंद झाली असून गतवर्षी याचदरम्यान १०९५.४४ मिमी पाऊस झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
 

Web Title: In Thane a protection wall fell on three vehicles no one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.