शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या बंदोबस्तासाठी ठाणे पोलीस पुन्हा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 01:15 IST

गेल्या पाच दिवसांपासून अंशत: सुरु असलेले लॉकडाऊन शनिवारी आणि रविवारी पूर्णत: राहणार आहे. त्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील नाक्या नाक्यांवर पोलिसांची कुमक तैनात केली आहे. राज्य राखीव दलाच्या चार तुकडयांसह होमगार्डचेही ४५० जवान या बंदोबस्तासाठी तैनात केले आहे.

ठळक मुद्दे राज्य राखीव दलाच्या चार तुकडयाही तैनात होमगार्डसह स्थानिक पोलीस रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गेल्या पाच दिवसांपासून अंशत: सुरु असलेले लॉकडाऊन शनिवारी आणि रविवारी पूर्णत: राहणार आहे. त्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील नाक्या नाक्यांवर पोलिसांची कुमक तैनात केली आहे. राज्य राखीव दलाच्या चार तुकडयांसह होमगार्डचेही ४५० जवान या बंदोबस्तासाठी तैनात केले आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर साथ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.मार्च २०२० पासून कोरोनाची साथ रोखण्यासाठी पोलिसांनी जीवाची पर्वा न करता बंदोबस्ताबरोबरच अनेकांना मदतीचा हात दिला. यात शेकडो पोलीस बाधित झाले तर ३५ हून अधिक पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत आहे. ती रोखण्यासाठी ठाणे पोलीस पुन्हा सज्ज झाले आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. ५ एप्रिल २०२१ पासून लागू केलेल्या या निर्बंधांमध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे. यात पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. याशिवाय, सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ या दरम्यान अत्यावश्यक कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदी आहे.याव्यतिरिक्त शुक्रवार आणि शनिवारी संपूर्ण लॉकडाऊनसह संचारबंदीही लागू आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळामध्ये साडे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त गस्तीसाठी तैनात केला आहे. प्रत्येक परिमंडळाच्या पातळीवरही हा बंदोबस्त असूनविनाकारण फिरणाºया नागरिकांवर साथ प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई केली जाणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त दुकाने खुली ठेवणारे तसेच कोरोनाची दर १५ दिवसांनी चाचणी न करणारे व्यावसायिक आणि त्यांचे कामगार यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.* लॉकडाऊन काळामध्ये बस, रेल्वे, खासगी बस आणि रिक्षा सुरु राहणार आहे. बसमध्ये उभे राहून प्रवासाला बंदी राहील. मास्क शिवाय, प्रवेश नसेल. रिक्षामध्ये दोन पेक्षा अधिक प्रवाशांना मुभा नाही.* नागरिकांसाठी पोलीस रस्त्यावरकोरोनाचे संकट पुन्हा आपल्यावर येऊ नये म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. कोरोनाचा प्रादुर्भाव मी करणार नाही आणि होऊ देणार नाही, असे म्हणत प्रत्येकाने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्याच बरोबर सामाजिक अंतर पाळून गर्दी टाळावी आणि मास्कचा वापर करावा, असे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले आहे. काही भागांमध्ये इच्छा नसतानाही नाईलाजाने कारवाई करावी लागत आहे. हे टाळण्यासाठी आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम पाळण्याचे आवाहन फणसळकर यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस