सराईत चोरटे गजाआड; ठाणे शहर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 14:19 IST2020-02-08T14:13:19+5:302020-02-08T14:19:42+5:30
विविध कंपनीचे 55 कार्ड पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केले आहेत.

सराईत चोरटे गजाआड; ठाणे शहर पोलिसांची कारवाई
ठाणे - एटीएम सेंटरमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून त्यानंतर त्यांना लुबाडणाऱ्या मुंब्रा येथील गियासुद्दीन अबू सिद्धीकी 26 आणि शौझान अब्दुल रेहमान आगा 24 या दोघांना ठाणे शहर पोलिसांनीअटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील 1 लाखांहुन अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
विविध कंपनीचे 55 कार्ड पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केले आहेत. ते दोघे सराईत चोरटे असून त्यांच्यावर कुर्ला, कल्याण, भिवंडी,ठाणे येथे 8 हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच ठाणे, मुंबई, नवीमुंबई, पुणे, जयपूर, सोलापूर, कर्नाटक व इतर ठिकाणी एटीएम कार्ड अदलाबदल करून फसवणूक केल्याचे 20 हुन अधिक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Election 2020 Live Updates : दुपारी 1 वाजेपर्यंत 19.37 टक्के मतदान
दिल्लीत जाऊ नका, 'या' भाजप नेत्याची फडणवीसांना हात जोडून विनंती
वारकऱ्यांची इंद्रायणी स्वच्छ होणार; खुद्द शरद पवारांनी घेतली जबाबदारी