शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

ठाणे महापालिकेचे पार्कींग धोरण बँक गॅरेन्टी अभावी लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 4:29 PM

ठाण्यात आजही कुठेही कशाही पध्दतीने वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्क होतांना दिसत आहेत. पालिकेने पार्कींग धोरण आणले खरे मात्र मागील कित्येक वर्षापासून ते अंमलबजावणीच्या प्रतिक्षेत आहे.

ठळक मुद्देरात्रीच्या पार्कींगची वसुलीच नाहीपिवळे पट्टेही होत आहेत, धुसर

ठाणे - मागील कित्येक वर्षे कागदावर असलेले पार्कींग धोरण आतापर्यंत अमलात येणे अपेक्षित होते. परंतु आता याचे पार्कींगचे दर निश्चित झाले असून स्पॉट अंतिम झाल्यानंतर पिवळे पट्टे मारण्यात आले आहेत. परंतु ते आता पुसले जाऊ लागले आहेत. शिवाय अपुऱ्या  मनुष्यबळाचा मुद्दा देखील मार्गी लागला आहे. परंतु ज्या ठेकेदाराला पार्कींगचे काम देण्याचे निश्चित झाले आहे, त्याने अद्याप बँक गॅरन्टीच भरली नसल्याने आता हे धोरण आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.पालिकेने तयार केलेल्या पार्कींग धोरणानुसार शहरातील १७७ रस्त्यांवर पार्कींगची व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणी तब्बल ९ हजार ८५५ वाहने पार्क होऊ शकणार आहेत. त्यानुसार आता या पार्कींगचे दरही मागील वर्षीच महासभेत मंजुर झाले आहेत. तसेच पार्कींगचे स्पॉट अंतिम झाल्यावर आता शहरातील बहुतेक ठिकाणी पालिकेने पिवळे पट्टे देखील मारले आहेत. तसेच रात्रीच्या पार्कींगची संकल्पना देखील पालिकेने पुढे आणली असून त्याची सुरवात १ नोव्हेंबर पासून करण्यात आली आहे. परंतु रात्रीच्या पार्कींगच्या ठिकाणी देखील दिवसा पार्कींग होतांना दिसत आहे. पालिकेच्या म्हणन्यानुसार आता हे स्पॉट सर्व वेळेसाठीच आहेत. त्यामुळे रात्रीचे पार्कींग सुरु असले तरी देखील त्याची कडक अंमलबाजवणी होतांना दिसत नाही. दुसरीकडे कर्मशिअल वाहनांसाठी रात्रीच्या पार्कींगसाठी चार चाकी वाहनांच्या दुप्पट रक्कम वसुल केली जाणार आहे. महापालिकेने अ, ब,क आणि ड अशा चार श्रेणींमध्ये रस्ते निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार अ वर्गात २९, ब वर्गात ५०, क वर्गात ३० आणि ड वर्गात ५७ रस्त्यांचा समावेश आहे.दरम्यान अशा प्रकारे पालिकेने पार्कींग धोरण तयार केल्यानंतर त्याला लागणाऱ्या मनुष्यबळाचा मुद्दा देखील काही अंशी का होईना मार्गी लागला आहे. परंतु पार्कींगचे काम ज्या ठेकेदाराला देण्यात आले आहे, त्याने अद्यापही बँक गँरन्टी भरली नसल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली आहे. त्यात आता जीएसटी लागल्याने खर्चातही फरक पडणार आहे. तसेच दरही बदले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे देखील संबधींत ठेकेदार बँक गॅरन्टी भरत नसावा असाही कयास लावला जात आहे. परंतु या सर्व प्रकारामुळे मागील कित्येक वर्षापासून अंमलबजावणीच्या प्रतिक्षेत असलेले पार्कींग धोरण अद्यापही खऱ्या अर्थाने मार्गी लागले नाही.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाParkingपार्किंग