ठाणे महापालिका प्रशासनाने महाडमध्ये राबविले सलग दुसऱ्या दिवशी ‘महास्वच्छता अभियान’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 11:19 PM2021-08-01T23:19:13+5:302021-08-01T23:25:24+5:30

शहर स्वच्छ करण्यात ठाणे महापालिकेने मोलाची कामगिरी बजावली आहे. शहरात साचलेल्या मातीचा गाळ, दुकाने तसेच राहत्या घरातील चिखल, कचरा महापालिकेच्या वतीने मशिन्स, जेसीबी आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने उचलण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्या या संपूर्ण कामाचे महाडवासींयांनी भरभरून कौतुक करीत प्रशासनाचे आभार मानले.

Thane Municipal Corporation launches 'Mahasvachchata Abhiyan' for second day in a row | ठाणे महापालिका प्रशासनाने महाडमध्ये राबविले सलग दुसऱ्या दिवशी ‘महास्वच्छता अभियान’

स्वच्छतेसाठी पालकमंत्री, महापौरांसह पालिका अधिकाऱ्यांनी ठोकला महाडमध्ये तळ

Next
ठळक मुद्देस्वच्छतेसाठी पालकमंत्री, महापौरांसह पालिका अधिकाऱ्यांनी ठोकला महाडमध्ये तळ महाडकरांनी ठाणे महापालिका प्रशासनाला दुवा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: महाड परिसरात महापुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शहर स्वच्छ करण्यात मोलाची कामगिरी बजावणाºया ठाणे महापालिका प्रशासनाचे महाडकरांनी आभार मानत सर्वांना दुवा दिल्या. महाड शहरासाठी सुरू केलेल्या ‘महास्वच्छता’अभियानामध्ये सलग दुसºया दिवशीही राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के स्वत: रस्त्यावर उतरले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेची यंत्रणा अधिक गतिमान करण्यात आली.
यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपआयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त शंकर पाटोळे, मुख्याधिकारी जीवन पाटील, वरिष्ठ उद्यान निरीक्षक केदार पाटील आदी उपस्थित होते. महाड परिसरात पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत कार्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पाठविलेल्या २०० कर्मचारी आणि अधिकाºयांच्या पथकांमार्फत जोरदार स्वच्छता मोहीम सुरु आहे. शहर स्वच्छ करण्यात ठाणे महापालिकेने मोलाची कामगिरी बजावली आहे. शहरात साचलेल्या मातीचा गाळ, दुकाने तसेच राहत्या घरातील चिखल, कचरा महापालिकेच्या वतीने मशिन्स, जेसीबी आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने उचलण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्या या संपूर्ण कामाचे महाडवासींयांनी भरभरून कौतुक करीत प्रशासनाचे आभार मानले.
महाड शहराच्या स्वच्छतेसाठी गेली दोन दिवस ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शिंदे, महापौर म्हस्के तसेच ठाणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आहेत. रविवारी दुसºया दिवशीही स्वत: पालकमंत्री शिंदे आणि महापौर म्हस्के यांनी महाडमधील शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळयाची स्वच्छता करून परिसरात धुरफवारणी आणि औषध फवारणी केली. यासोबतच प्रमुख बाजारपेठ, मुख्य रस्ते तसेच लहान गल्ली बोळ यांची पायी चालतच पाहणी केली. तसेच साचलेला चिखल उचलण्यासाठी अधिकचे मनुष्यबळ वाढविण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले.
महाडमधील चवदार तळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, विरेश्वर देवालय तसेच इतर स्थानिक मंदिराची आणि परिसराची स्वच्छता केली. यामध्ये ठाणे महापालिकेच्या ड्रेनेज लाईन स्वच्छ करणारे टँकर्स, २० जेसीबी, २० डंपर, पाच घंटागाड्या, ठाणे महानगरपालिकेची सहा अत्याधुनिक जेटिंग मशिन्स, फायर ब्रिगेड टँकर्स, स्प्रेइंग मशीन्स आणि रोगराई पसरू नये यासाठी मारण्यात येणारी फोगिंग मशिन्स आदी यंत्रणेच्या माध्यमातून महाड शहरात ‘महास्वच्छता’ मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Thane Municipal Corporation launches 'Mahasvachchata Abhiyan' for second day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.