ठामपाचे सहायक आयुक्त महेश आहेर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
By अजित मांडके | Updated: February 15, 2023 19:48 IST2023-02-15T19:47:19+5:302023-02-15T19:48:09+5:30
ठाणे महानगर पालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली.

ठामपाचे सहायक आयुक्त महेश आहेर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची कबुली देणारी ठाणे महानगर पालिकेतील अधिकारी महेश आहेर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या कथित ऑडिओ क्लीपमुळे ठाण्यात खळबळ माजली आहे. या क्लिपनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज संध्याकाळी 6 च्या सुमारास महापालिका मुख्यालयाजवळ धाव घेऊन प्रवेशद्वाराजवळ महेश आहेर यांना मारहाण केली.
महापालिका अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त महेश आहेर यांना संध्याकाळी ठाणे महापालिका मुख्यालयाजवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. #thane#jitendraawhad#ncppic.twitter.com/pms1EOci7i
— Lokmat (@lokmat) February 15, 2023