Thane: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' भागांत उद्यापासून २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 18:04 IST2026-03-11T18:01:18+5:302026-03-11T18:04:57+5:30

Thane Water Supply News: सिद्धेश्वर पाण्याच्या टाकीजवळ पाईपलाईनचे काम सुरू असल्याने ठाण्यातील अनेक भागात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे

Thane: Important news for Thane residents, water supply will be cut off for 24 hours in 'these' areas from tomorrow! | Thane: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' भागांत उद्यापासून २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद!

Thane: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' भागांत उद्यापासून २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद!

ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.  सिद्धेश्वर पाण्याच्या टाकीजवळ पाईपलाईनचे काम सुरू असल्याने ठाण्यातील अनेक भागात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे ठाणे महानगरपालिकेने सांगितले असून गरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ते काटकसरीने वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू असल्याने सिद्धेश्वर पाण्याच्या टाकीला जोडलेल्या ६०० मिमी व्यासाच्या आउटलेट पाईपलाईनवर परिणाम होत आहे. नवीन पाईपलाईन बसविण्यासाठी सध्याची पाईपलाईन हलवावी लागेल. या कामामुळे गुरुवारी (१२ मार्च २०२६) सकाळी ०९:०० वाजल्यापासून शुक्रवारी (१३ मार्च २०२६) सकाळी ०९.०० वाजेपर्यंत ठाण्यातील अनेक भागांत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

'या' भागांत पाणीपुरवठा राहणार बंद

उथळसर वॉर्डातील सिद्धेश्वर तलाव परिसर, रमाबाई आंबेडकर नगर, गणेशवाडी, नितीन कंपनी परिसर, पाचपाखाडी, सरोवर दर्शन, चंदनवाडी, हंसनगर, सिंग नगर, खोपट, फ्लॉवर व्हॅली, शेलार पाडा, गोकुळदासवाडी, कोलबाड आणि गोकुळनगर यासह अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या व्यतिरिक्त, नौपाडा वॉर्डातील काही भागांनाही पाणीपुरवठा खंडित होईल, ज्यात पाचपाखाडी, चंदनवाडी, महानगरपालिका परिसर, चरई आणि धोबी अली परिसराचा समावेश आहे.

Web Title : ठाणे: प्रमुख क्षेत्रों में कल से 24 घंटे पानी की आपूर्ति बाधित

Web Summary : ठाणे निवासियों को कल से 24 घंटे पानी की आपूर्ति बंद का सामना करना पड़ेगा, क्योंकि सिद्धेश्वर टैंक के पास पाइपलाइन का काम चल रहा है। उथलसर, नौपाड़ा और पांचपाखाड़ी समेत कई इलाके प्रभावित होंगे। निवासियों को पानी का भंडारण करने और कम उपयोग करने की सलाह दी जाती है।

Web Title : Thane Faces 24-Hour Water Supply Disruption Starting Tomorrow in Key Areas

Web Summary : Thane residents will face a 24-hour water supply shutdown starting tomorrow due to pipeline work near Siddheshwar tank. Several areas including Uthalsar, Naupada and Pachpakhadi will be affected. Residents are advised to store and use water sparingly.