Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 21:15 IST2025-05-22T21:12:07+5:302025-05-22T21:15:07+5:30
Thane Crime: सव्वा कोटींच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये मागील तीन महिन्यांपासून फरार असलेल्या महिलेला ठाण्यातून अटक करण्यात आले.

Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
Thane Crime News: 2.25 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात फरार असलेल्या महिलेला अटक करण्यात अखेर यश आले. तीन महिन्यांपासून ही महिला फरार होती. ही महिला सातत्याने पोलिसांना आणि संबंधित तपास यंत्रणांना चकमा देत होती. अखेर गुरूवारी (२२ मे) ठाण्यात अटक केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ठाणे पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती दिली. रिपोर्टनुसार, अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव निलोफर शेराली सेंडोले असे आहे. ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने तिला विक्रोळीतून अटक केली. ती वांद्रेवरून मुंब्राला जात होती. त्याचवेळी ही कारवाई करण्यात आली.
एका फ्लॅटमध्ये जप्त केले होते ड्रग्ज
फेब्रुवारीमध्ये ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने शहरातील शीळ परिसरातील एका ठिकाणी छापा टाकला होता. तेथील एका फ्लॅटमधून २.२५ कोटी रुपये किंमत असलेले ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणात पोलिसांनी इलियास खान (वय १९), अमन (वय २१) आणि सैफ खान (वय २५) यांना अटक केली होती.
निलोफरचा पोलीस घेत होते शोध
पोलिसांनी सांगितले की, ज्या फ्लॅटमधून ते ड्रग्ज जप्त करण्यात आले, तो फ्लॅटच निलोफरच्या नावावर आहे. तिन्ही आरोपी तिला ड्रग्ज पोहोचवणारे होते. तेव्हापासूनच ती फरार झाली होती. ती वांद्रे येथील म्हाडा ग्राऊंडमध्ये काम करत होती. तिच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असून, आता तपास सुरू करण्यात आला आहे.