Gudi Padwa 2026: गुढीपाडवा आणि नववर्ष स्वागत यात्रेमुळे ठाणे-डोंबिवलीत मोठे वाहतूक बदल; घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' मार्ग तपासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 11:31 IST2026-03-17T11:28:03+5:302026-03-17T11:31:54+5:30

Thane Dombivali Traffic Advisory for Gudi Padwa 2026: १९ मार्च २०२६ रोजी निघणाऱ्या या भव्य स्वागतयात्रांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कंबर कसली आहे.

Thane Dombivali Traffic Update: Traffic changes in city due to Gudi Padwa 2026 Swagat Shobha Yatra & Marathi New Year Celebration | Gudi Padwa 2026: गुढीपाडवा आणि नववर्ष स्वागत यात्रेमुळे ठाणे-डोंबिवलीत मोठे वाहतूक बदल; घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' मार्ग तपासा

Gudi Padwa 2026: गुढीपाडवा आणि नववर्ष स्वागत यात्रेमुळे ठाणे-डोंबिवलीत मोठे वाहतूक बदल; घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' मार्ग तपासा

Thane Dombivali Gudi Padwa 2026:गुढीपाडवा आणि नववर्ष स्वागत यात्रेमुळे ठाणे आणि डोंबिवली या दोन्ही शहरांतील वातावरणात आतापासूनच चैतन्य पसरले आहे. १९ मार्च २०२६ रोजी निघणाऱ्या या भव्य स्वागतयात्रांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कंबर कसली आहे. तुम्ही जर या दिवशी प्रवासाचे नियोजन करत असाल, तर कोणत्या मार्गावर वाहने बंद राहतील आणि कुठे पार्किंगला मनाई असेल, याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

ठाणे स्वागत यात्रेसाठी वाहतूक अधिसूचना जारी

ठाण्यातील मानाच्या स्वागत यात्रेसाठी वाहतूक पोलिसांनी विशेष नियमावली तयार केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी शहरातील काही मुख्य मार्ग वळवण्यात आले आहेत.

वाहतुकीचे नियम आणि पर्यायी मार्ग

गुढीपाडवा आणि नववर्ष स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात वाहतूक बदल लागू केले आहेत. कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे आयोजित स्वागत यात्रा १९ मार्चला सकाळी ६:३० वाजता कौपिनेश्वर मंदिर येथून सुरू होणार आहे. डॉ. मूस चौक, वंदना टी पॉईंट, गजानन महाराज चौक, मढवी हाऊस परिसर तसेच गडकरी सर्कल येथील काही मार्गांवर वाहने बंद करण्यात येणार आहे. या वाहनांना जांभळी नाका, चिंतामणी चौक, दगडी शाळा आणि टीएमसी सर्कलमार्गे पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे. चिंतामणी चौक ते गडकरी सर्कल, राम मारुती रोड, साई कृपा हॉटेल ते एसबीआय कॉर्नर दरम्यान दोन्ही बाजूंना वाहन पार्किंगवर बंदी घातली आहे. ही वाहतूक अधिसूचना १९ मार्च रोजी सकाळी ५ ते दुपारी ३ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना यातून सवलत दिली आहे.

डोंबिवली फडके रोड परिसरात यात्रेचा उत्साह

सांस्कृतिक नगरी डोंबिवलीतही गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला पोहोचलेला पाहायला मिळेल. १९ मार्चला सकाळी ६:३० वाजता भागशाळा मैदान येथून स्वागतयात्रेचा श्रीगणेश होणार असून ती फडके रोडमार्गे पुढे मार्गस्थ होईल.

वाहतुकीचे नियम आणि पर्यायी मार्ग

डोंबिवलीची ही शोभायात्रा फडके रोड, बाजीप्रभु चौक आणि मदन ठाकरे चौक या भागातून जाणार असल्याने इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. या काळात वाहनचालकांनी शक्यतो या परिसराचा वापर टाळावा. आपल्या लाडक्या शहरात होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याला गालबोट लागू नये आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे.

Web Title : गुड़ी पड़वा 2026: ठाणे-डोंबिवली में यातायात परिवर्तन, रूट जांचें!

Web Summary : गुड़ी पड़वा 2026 के उत्सव के लिए ठाणे और डोंबिवली में यातायात बदला गया है। 19 मार्च को जुलूस के लिए कुछ रास्ते बंद रहेंगे। भीड़ से बचने के लिए वैकल्पिक मार्गों का उपयोग करें और अधिकारियों का सहयोग करें। प्रमुख क्षेत्रों में पार्किंग प्रतिबंधित है।

Web Title : Thane-Dombivli Traffic Changes for Gudi Padwa 2026 Celebrations: Check Routes!

Web Summary : Gudi Padwa 2026 celebrations in Thane and Dombivli prompt traffic changes. Certain routes will be closed for processions on March 19th. Use alternative routes to avoid congestion and cooperate with authorities. Parking restrictions apply in key areas.