वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश 

By नितीन पंडित | Updated: October 27, 2022 16:45 IST2022-10-27T16:45:10+5:302022-10-27T16:45:50+5:30

वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. 

Thane District President of Vanchit Bahujan Aghadi Sunil Bhagat has joined the Shiv Sena Thackeray faction  | वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश 

वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश 

भिवंडी : वंचित बहुजन आघाडीत ठाणे जिल्हा अध्यक्ष असलेले सुनील भगत यांनी बाळासाहेब आंबेडकर यांची साथ सोडत बुधवारी शिवसेनेच्या ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भगत यांनी शिवसेना ठाकरे गटात हाती शिवबंधन बांधून प्रवेश केला आहे. भगत यांच्या प्रवेशाने ठाकरे गटात आनंदाचे वातावरण पसरले असून वंचित बहुजन आघाडीला मोठा फटका बसला आहे.

या पक्षप्रवेश प्रसंगी सुनील भगत यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष संतोष कोरके, कौशल वर्मा, दिलीप नगरकर यांनी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकीत उद्धव ठाकरे यांचे संयमी व अभ्यासू नेतृत्व राज्याला अत्यावश्यक असल्याने त्यांच्या नेतृत्वावर आम्ही विश्वास व्यक्त करीत असून त्यांचे हात बळकट करण्याकरीता आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करीत असल्याची प्रतिक्रिया सुनील भगत यांनी दिली आहे. 

  

Web Title: Thane District President of Vanchit Bahujan Aghadi Sunil Bhagat has joined the Shiv Sena Thackeray faction