ठाणे जिल्हा परिषदेत सेना-राष्ट्रवादी सोबत आता एक सभापती पद घेऊन भाजपा सत्तेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 20:58 IST2019-07-08T20:54:48+5:302019-07-08T20:58:03+5:30

सत्तेबाहेर असलेल्या भाजपाला सेनेने स्वत:कडील महिला बालकल्याण समितीचे सभापद भाजपाला देऊन राज्याच्या सत्तेतील युती जिल्ह्यात बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर पाच वर्षे सत्तेत सोबत ठेवण्याचा शब्द राष्ट्रवादीला दिल्याप्रमाणे त्यांच्या वाट्याचे दोन सभापती राष्ट्रवादीला सेनेने बिनदिक्कत बहाल केले आहेत

Thane District Council with the Army-NCP, now the BJP is in power with a post of President! | ठाणे जिल्हा परिषदेत सेना-राष्ट्रवादी सोबत आता एक सभापती पद घेऊन भाजपा सत्तेत !

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात या चार विषय समित्यांच्या सभापतींची सोमवारी निवड

ठळक मुद्देसेनेच्या वाट्याचे महिला व बालकल्याण समितीचे सभापती पद भाजपालापाच वर्षे सत्तेत सोबत ठेवण्याचा शब्द राष्ट्रवादीलादोन सभापती राष्ट्रवादीला सेनेने बिनदिक्कत बहाल केले

ठाणे : जिल्हा परिषद विषय समित्यांच्या चार सभापती पदांची निवड आज बिनविरोध पार पडली. या सभापती निवडीच्या माध्यमातून येथील शिवसेना,राष्ट्रवादीच्या सत्तेत आता भाजपाला देखील सहभागी करून घेण्यात आले. सेनेच्या वाट्याचे महिला व बालकल्याण समितीचे सभापती पद भाजपाला प्राप्त देत सत्तेत घेतले आहे. राष्ट्रवादीसोबत आता भाजपालाही सत्तेत घेत आता जिल्हा परिषदेत सेना, राष्ट्रवादी आणि भाजपाची सत्ता आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय दिग्ग्जांमध्ये तर्कवितर्क काढले जात आहे.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात या चार विषय समित्यांच्या सभापतींची सोमवारी निवड झाली. बिनविरोध निवड झाले सभापतीं विरोधात कोणत्याही सदस्यांने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. यामुळे चारही सभापतींची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा परिषदेत स्वत:कडे अध्यक्ष पदासह दोन सभापती पदे घेऊन सत्तेत असलेल्या सेनेने राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद व दोन सभापती पदे देऊन सोबत ठेवले. पण आज सत्तेबाहेर असलेल्या भाजपाला सेनेने स्वत:कडील महिला बालकल्याण समितीचे सभापद भाजपाला देऊन राज्याच्या सत्तेतील युती जिल्ह्यात बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर पाच वर्षे सत्तेत सोबत ठेवण्याचा शब्द राष्ट्रवादीला दिल्याप्रमाणे त्यांच्या वाट्याचे दोन सभापती राष्ट्रवादीला सेनेने बिनदिक्कत बहाल केले आहेत.
बिनविरोध निवड झालेल्या या सभापतीपदी भिवंडी तालुक्यातील कांदळी-पडघा येथील सेनेच्या वैशाली चंदे,यांची बांधकाम व आरोग्य सभापतीपदी निवड झाली. तर भाजपाच्या सपना भाईर ह्या रानाळे येथील असून त्यांची महिला व बाल कल्याण सभापती पदी निवड झाली आहे. तर राष्ट्रवादीच्या डोळखांब ता. शहापूर येथील संगिता गांगड यांची कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती पदी तर भिवंडीच्या अनगांव येथील किशोर जाधव यांची समाजकल्याण सभापती निवड झाली आहे. बिनविरोध निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी शिवसेनेतर्फे कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह राष्ट्रवादीतर्फे जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी जबाबदारी पार पाडली. पक्ष श्रेष्टीनी ठरवून दिल्याप्रमाणे या आधींच्या सभापतींनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी आता या नवीन सभापतींची सव्वा वर्षासाठी निवड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ५३ सदस्यांसह कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी येथील पंचायत समित्यांच्या पाच सभापतींना या निवडीसाठी मतदानाचा हक्क दिला होता. पण निवड बिनविरोध झाल्यामुळे त्यांना मतदान करण्याची देखील संधी मिळाली नाही.

Web Title: Thane District Council with the Army-NCP, now the BJP is in power with a post of President!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.