ठाण्यात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या हिंदी मालिकांमधील अभिनेत्रीला अटक; दोन तरुणींची सुटका

By जितेंद्र कालेकर | Updated: March 1, 2026 21:00 IST2026-03-01T20:56:54+5:302026-03-01T21:00:49+5:30

मॉडेलिंगचे आमिष दाखवून देहविक्री करायला लावणाऱ्या अभिनेत्रीला ठाण्यातून अटक

Thane Crime TV Actress Arrested for Running Human Trafficking Racket 2 Models Rescued | ठाण्यात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या हिंदी मालिकांमधील अभिनेत्रीला अटक; दोन तरुणींची सुटका

ठाण्यात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या हिंदी मालिकांमधील अभिनेत्रीला अटक; दोन तरुणींची सुटका

Thane Crime: दहा हजारांचे आमिष दाखवून टीव्ही मालिका तसेच माॅडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या नवख्या कलाकार तरुणींना सेक्स रॅकेटमध्ये अडकविणाऱ्या २७ वर्षीय दलाल अभिनेत्रीला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने रविवारी दिली. यावेळी दाेन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. त्यांना महिला गृहात पाठविण्यात आले आहे.

हिंदी मालिका आणि मॉडेलिंगमधील ज्युनिअर कलाकारांना जादा पैशांचे आमिष दाखवून त्यांना देह विक्रयाच्या व्यवसायात ढकलणारी अभिनेत्री दलाल म्हणूनही काम करीत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली हाेती. त्या आधारे पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहायक पाेलीस आयुक्त रवींद्र दाैंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पेालिस निरीक्षक वैशाली गाेरडे, उपनिरीक्षक स्नेहल शिंदे आणि हवालदार व्ही. आर. पाटील आदींच्या पथकाने २८ फेब्रुवारीला दुपारी २.३५ वाजेच्या सुमारास मासुंदा तलाव भागात सापळा लावून अभिनेत्रीला अटक केली. ती स्वत: काही हिंदी मालिकांमध्ये कलाकार म्हणून काम करीत असून तिच्यासाेबत माॅडेलिंग आणि यू ट्युब चॅनलवर काम करणाऱ्या तिच्या ओळखीच्या काही महिला आणि तरुणींना ती शरीर विक्रय करण्यासाठी प्रवृत्त करीत असल्याचेही चाैकशीत उघड झाले.

पाेलिसांनी पाठविलेल्या बनावट ग्राहकाकडून तिने ३० हजार रुपये घेतले हाेते. २० हजार रुपये स्वत:कडे ठेवून दहा हजार रुपये पीडित तरुणीला देण्याचे ठरले हाते. वर्षभरापासून सेक्स रॅकेट चालवित असल्याची कबुलीही तिने पाेलिसांना दिली.

Web Title : ठाणे में सेक्स रैकेट चलाने वाली टीवी अभिनेत्री गिरफ्तार; दो छुड़ाई गईं।

Web Summary : ठाणे पुलिस ने सेक्स रैकेट चलाने वाली एक टीवी अभिनेत्री को गिरफ्तार किया। वह जूनियर कलाकारों और मॉडलों को पैसे का लालच देती थी। दो महिलाओं को रैकेट से छुड़ाया गया और उन्हें महिला आश्रय गृह भेजा गया। अभिनेत्री ने एक साल से रैकेट चलाने की बात कबूल की।

Web Title : TV actress arrested in Thane sex racket; two rescued.

Web Summary : Thane police arrested a TV actress running a sex racket. She lured junior artists and models with money. Two women were rescued from the racket and sent to a women's shelter. The actress confessed to running the racket for a year.