Thane Crime: 'बनावट' सीबीआय अधिकाऱ्याने नोकरीचे आमिष दाखवून घातला गंडा? अधिकारी पोलिसांच्या ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 00:09 IST2026-04-09T00:08:55+5:302026-04-09T00:09:17+5:30

उल्हासनगरात हा संशयित सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करत फिरत होता. आपण मोठ्या पदावर असून सीबीआयमध्ये नोकरी लावून देऊ शकतो, असे तो सांगत होता.

Thane Crime: 'Fake' CBI officer duped by luring him with job offer? Officer in police custody | Thane Crime: 'बनावट' सीबीआय अधिकाऱ्याने नोकरीचे आमिष दाखवून घातला गंडा? अधिकारी पोलिसांच्या ताब्यात 

Thane Crime: 'बनावट' सीबीआय अधिकाऱ्याने नोकरीचे आमिष दाखवून घातला गंडा? अधिकारी पोलिसांच्या ताब्यात 

उल्हासनगर शहरात स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून सुशिक्षित तरुण-तरुणींना नोकरीचे आमिष दाखवत लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या एका भामट्याला विठ्ठलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कंबरेला बनावट पिस्तूल आणि सीबीआयचा रुबाब दाखवत वावरणाऱ्या या तोतया अधिकाऱ्याचा भांडाफोड वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे झाला आहे.

उल्हासनगरात हा संशयित सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करत फिरत होता. आपण मोठ्या पदावर असून सीबीआयमध्ये नोकरी लावून देऊ शकतो, असे आमिष त्याने अनेकांना दाखवले होते. 

या आमिषाला बळी पडून अनेकांनी त्याला लाखो रुपये दिले. विशेष म्हणजे, आपला बनाव खरा वाटावा यासाठी तो कायम सीबीआय अधिकाऱ्यासारखा पेहराव करायचा आणि सोबत बनावट पिस्तूल बाळगायचा. हा बनावट अधिकारी एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या संपर्कात असल्याची चर्चा परिसरात होती. 

काही फसवणूक झालेल्या व्यक्तींनी 'वंचित बहुजन आघाडी'चे पदाधिकारी सोनू आणि मोनू पवार यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. पवार यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला असता, समोर आलेली व्यक्ती बनावट असल्याचे उघड झाले. 

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या बनावट अधिकाऱ्याला पोलिसांच्या बुधवारी रात्री हवाली केले. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. असे सांगितले. 

त्याने लोकांकडून पैसे घेतल्याची कबुली दिली असून ते पैसे लिहून देऊन परत करणार असल्याचे जबाब दिला आहे. मात्र, अद्याप एकही फसवणूक झालेली व्यक्ती अधिकृत तक्रार देण्यासाठी पुढे आलेली नाही.

 

Web Title : ठाणे में नौकरी घोटाले के लिए नकली सीबीआई अधिकारी गिरफ्तार

Web Summary : उल्हासनगर में सीबीआई अधिकारी बनकर नौकरी का झांसा देने वाला ठग गिरफ्तार। उसने नौकरी का वादा किया, लाखों लिए और नकली पिस्तौल रखी। सतर्क कार्यकर्ताओं ने उसे उजागर किया और पुलिस को सौंप दिया। पीड़ितों ने अभी तक शिकायत दर्ज नहीं कराई है।

Web Title : Fake CBI Officer Arrested in Thane for Job Scam

Web Summary : A conman posing as a CBI officer in Ulhasnagar was arrested for swindling job seekers. He promised jobs, took lakhs, and carried a fake pistol. Vigilant activists exposed him and handed him to police. Victims are yet to file complaints.