अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आराेपीला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 22:04 IST2025-07-04T22:03:59+5:302025-07-04T22:04:30+5:30
यावेळी आराेपीच्या शिक्षेसाठी सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी जाेरदार बाजू मांडली...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आराेपीला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा आदेश
ठाणे: एका १३ वर्षीय मुलीला िफरायला जाण्याचा बहाणा करुन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रिन्स मिश्रा (२३, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या आराेपीला दहा वर्ष सश्रम कारावासाची तसेच २० हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट, किसननगर भागात हा घृणास्पद प्रकार घडला हाेता. मिश्रा याने त्याचा मित्र अक्रम खान (२५, रा. सावरकरनगर, ठाणे) याच्या घरात पिडित मुलीला २ नाेव्हेंबर २०१८ राेजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास गपा मारण्याच्या बहाण्याने रिक्षाने नेले हाेते. तिथे गेल्यानंतर त्याने या मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला हाेता. याप्रकरणी पिडितेच्या आईने श्रीनरग पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर मिश्रा आणि त्याचा मित्र अक्रम या दाेघांनाही तत्कालीन सहायक पाेलीस आयुक्त प्रकाश निलेवाड आणि उपनिरीक्षक आर. एम. गाेसावी यांच्या पथकाने अटक केली हाेती. याच खटल्याची सुनावणी ३ जुलै २०२५ राेजी ठाण्याचे विशेष पाेक्साे न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात झाली.
यावेळी आराेपीच्या शिक्षेसाठी सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी जाेरदार बाजू मांडली. तर वरिष्ठ पेालीस निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांच्या पथकाने सर्व साक्षी पुरावे सादर केले. त्याच आधारे आराेपीला दहा वर्षे सक्त मजूरीची िशक्षा सुनावली. यात त्याचा साथीदार अक्रम याची मात्र सबळ पुराव्याअभावी निर्दाेष मुक्तता करण्यात आली.