शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यरत पालकमंत्री शिंदे, महापालिका आयुक्त आपत्ती व्यवस्थापन कक्षात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 16:02 IST

परिस्थितीचा घेतला आढावा

ठळक मुद्देकळवा येथील रघकुल सोसायटीमधील  २५  रहिवाशांना जवळच्या शाळेमध्ये हलविण्यात आले आहे. नागरिकांना तात्काळ मदत पुरविण्यात येत आहे. या ठिकाणाहून जवळपास ४ हजार रहिवाश्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले असून तिथे मदतकार्य सुरूच आहे.

ठाणे - गेले दोन दिवस सतत सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असून आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक आरोग्य तथा ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला तसेच आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान बारवी धरणातून पाणी सोडल्यामुळे उल्हास नदी आणि खाडीच्या पाण्याची पातळी वाढली असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. 

ठाणे शहरात कालपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून महापालिका आयुक्त सर्व लोकप्रतिनिधी, स्थानिक नगरसेवक यांच्याशी समन्वय साधून आहेत. तसेच महापालिका मुख्यालयासह, प्रभाग समिती स्तरिय यंत्रणा, आपत्कालीन नियंत्रण यंत्रणा कार्यरत आहे. दिवा येथे टीडीआरएफच्या दोन तुकड्या, ६ बोटी उप आयुक्त, दोन सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता मदत कार्य करीत आहेत. या ठिकाणाहून जवळपास ४ हजार रहिवाश्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले असून तिथे मदतकार्य सुरूच आहे. कळवा येथेही टीडीआरएफची एक तुकडी सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, बोटसह संपूर्ण यंत्रणा मदतकार्यात कार्यरत आहे. येथील रघकुल सोसायटीमधील २५ रहिवाशांना जवळच्या शाळेमध्ये हलविण्यात आले आहे. श्रीरंग आणि वृंदावन सोसायटी येथेही महापालिकेने बोट पाठविण्यात आली आहे. नागरिकांना तात्काळ मदत पुरविण्यात येत आहे. 

मुंब्रा येथील चार घरांचा भाग कोसळल्यामुळे ती घरे खाली करण्यात आली तर माजिवडा प्रभाग समिती येथील पातलीपाडा येथील धोकादायक स्थितीतील २५ घरे खाली करण्यात आली. येथील लोकांना संक्रमण शिबीरामध्ये स्थलांतरित केले आहे. कळवा येथील रघकुल सोसायटीमधील  २५  रहिवाशांना जवळच्या शाळेमध्ये हलविण्यात आले आहे. वर्तकनगरयेथील स्ट्रीट चिल्ड्रन शेल्टर होम येथील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेमध्ये स्थलातंरित करण्यात आले आहेत. दरम्यान महापालिकेच्या सर्व यंत्रणेशी महापालिका आयुक्त स्वत: संपर्कात असून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाRainपाऊसEknath Shindeएकनाथ शिंदेcommissionerआयुक्त