शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास! 'टीएमटी'ला उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना नाकीनऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 17:19 IST

आधीच डबघाईत असलेल्या ठाणे परिवहन सेवेचा गाडा कोरोनाच्या दुस:या लाटेच्या लॉकडाऊनमध्ये पूर्णपणो रुळावरुन खाली आला आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवितांना नाकी नऊ येऊ लागले आहेत.

ठाणे  : आधीच डबघाईत असलेल्या ठाणे परिवहन सेवेचा गाडा कोरोनाच्या दुस:या लाटेच्या लॉकडाऊनमध्ये पूर्णपणो रुळावरुन खाली आला आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवितांना नाकी नऊ येऊ लागले आहेत. महिनाकाठी जमतेम एक ते दीड कोटीच्या आसपास उत्पन्न येत असतांना खर्च मात्र तिप्पट होत आहे. त्यामुळे खाजगी ठेकेदाराचे पैसे देखील टप्याटप्याने दिले जात आहेत. तर डिङोल आणि सीएनजीपोटीच तीन ते चार कोटींचा खर्च होत आहे. त्यात पालिकेकडून येणाऱ्या  अनुदानातूनच सध्या येथील कर्मचाऱ्यांचा पगार निघत आहे.ठाणे  परिवहनच्या ताफ्यात ३५० हून अधिक बसेस आहे. यातील २९० बसेस या खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून रस्त्यावर धावत आहे. त्यातून लॉकडाऊनपूर्वी परिवहनचे उत्पन्न हे २३ ते २७ लाखांच्या घरात प्रतीदीन गेले होते. परंतु पहिल्या आणि दुस:या लॉकडाऊनमुळे परिवहनचा गाडा चिखलात रुतला असून तो बाहेर काढणो आता कठीण होत चालले असल्याचे चित्र आहे. दुसरा लॉकडाऊन पडण्याच्या आधी परिवहनच्या २३० च्या आसपास बसेस रस्त्यावर धावत होत्या. त्यातून परिवहनला १५ ते १६ लाखांचे उत्पन्न मिळत होते. एक लाखाच्या आसपास प्रवासी रोज बसेसमधून प्रवास करीत होते.दरम्यान आता कोरोनाची दुसरी लाट आली आणि त्यामुळे परिवहन सेवेला देखील याचा फटका बसल्याचे दिसून आले आहे. परिवहनच्या सध्या १८० च्या आसपास बसेस रस्त्यावर उतरल्या जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातून केवळ एका एका सीटवर एक प्रवासी असल्याने रोज परिवहनमधून ४० हजारांच्या आसपास प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत. त्यातून परिवहनला केवळ ६ लाखांच्या आसपासच उत्पन्न मिळत असल्याची माहिती परिवहनच्या सुत्रंनी दिली. त्यामुळे महिन्याला १ ते दिड कोटींच्या आसपासच उत्पन्न मिळतांना दिसत आहे. त्यातून परिवहनचा गाडा कसा हाकायचा असा पेच परिवहन प्रशासनाला सतावू लागला आहे. पालिकेकडून कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी येणा:या अनुदानातूनच कर्मचा:यांचा कसाबसा पगार निघत आहे. परंतु बसेस दुरुस्ती होत नाही, टायर बदलण्यासाठी पैसे नसल्याने बसेस आगारात धुळ खात पडून आहेत.

व्होल्वोच्या केवळ ९ बसेस रस्त्यावर उतरविण्याची तयारी परिवहनने केली आहे. परंतु उर्वरीत २१ बसेस बंद आहेत. सीएनजी, डिङोल यासाठी महिनाकाठी १ कोटींच्या आसपास खर्च जात आहे. जीसीसीचे पेमेंट पाच ते सहा कोटी द्यावे लागत आहे. त्यातून आता ५० टक्यांच्या आसपास दिले जात आहे. परंतु आता त्यांचे पमेंट देखील थांबविण्यात आले आहे. एकूणच उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने बसेसचा मेटेन्सन देखील होत नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाBus Driverबसचालकthaneठाणे