Thane Accident: कंटेनरची मेट्रोच्या वाहनाला धडक; चालक अडकला; अर्ध्या तासाने सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:52 IST2025-09-01T12:51:23+5:302025-09-01T12:52:44+5:30
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरची मेट्रोच्या कामासाठी उभ्या असलेल्या वाहनाला धडक बसली. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.

Thane Accident: कंटेनरची मेट्रोच्या वाहनाला धडक; चालक अडकला; अर्ध्या तासाने सुटका
ठाणे: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरची मेट्रोच्या कामासाठी उभ्या असलेल्या वाहनाला धडक बसली. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. यात कंटेनरचालक राम तेरज (४२) जखमी झाला. अडकलेल्या चालकाला अपघातग्रस्त वाहनातून सुखरूप बाहेर काढल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
घोडबंदर मागे मालवाहू कंटेनर घेऊन राम तेरज हा सुरतकडे जात होता. त्यावेळी रस्त्यावर मेट्रोच्या कामासाठी उभा असलेल्या वाहनाला कंटेनरची धडक बसली. या धडकेमुळे अपघातग्रस्त कंटेनरच्या केबिनमध्ये चालक राम हा अडकला होता. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे २० ते २५ मिनिटांच्या प्रयत्नानंतर चालक रामला सुखरूप बाहेर काढले. राम याच्या दोन्ही पायांना किरकोळ
दुखापत झाल्याने त्याच्यावर महापालिकेच्या रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघातामुळे ठाण्याकडून घोडबंदर रोडकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याची माहिती सूत्रांनी दिली.