एकाच शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; बदलापूरमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 17:13 IST2024-08-17T17:13:01+5:302024-08-17T17:13:54+5:30
Thane Crime News: बदलापूर मध्ये एकाच शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत लैंगिक शोषण झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केलेली नाही.

एकाच शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; बदलापूरमधील धक्कादायक प्रकार
- पंकज पाटील
बदलापूर - बदलापूर मध्ये एकाच शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत लैंगिक शोषण झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केलेली नाही.
बदलापूर शहरात संस्कृतीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर नराधमाने अत्याचार केले आहेत. या प्रकरणात एका मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत, तर दुसऱ्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुली प्रसाधनगृहात जात असताना शाळेतील एका कर्मचाऱ्याने संतापजनक प्रकार मुलींसोबत केला आहे. दोन्ही मुलींनी पालकांना याबाबत माहिती दिल्यानंतर पालकांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 12 ते 13 ऑगस्ट ला हा प्रकार घडला होता. त्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाला माहिती दिल्यावर मुलींची खाजगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणी नंतर मुलींवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. बदलापूर शहरात काही दिवसांपूर्वीच एका बारा वर्षे मुलीवर सुद्धा अत्याचार झाला होता. याचा अजून पोलिसांना तपास लागलेला नाही. त्यातच आता हा समाजाला काळीमा फासणारा प्रकार घडल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
- बदलापुरातील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडल्यामुळे शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थी देखील नराधमापासून संरक्षित राहू शकत नाही ही बाब समोर आली आहे.
- दरम्यान या प्रकार त्या चिमुकला विद्यार्थिनी आपल्या बालकांना सांगितल्यामुळे उघडतीस आला आहे त्यामुळे याआधी इतर कोणत्या विद्यार्थिनी सोबत असा प्रकार घडला आहे काय याची चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
- दरम्यान हा प्रकार पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता त्यांना तब्बल 12 तास रखडवून ठेवण्यात आले आणि बारा तासानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली.