Thane: प्रेमसंबंधाच्या बहाण्यातून शाळकरी मुलीवर मित्राकडून अत्याचार, मुलगी गर्भवती राहिल्यानंतर झालं उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 22:45 IST2023-08-06T22:45:16+5:302023-08-06T22:45:31+5:30

Thane: एका १२ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिच्याच एका १६ वर्षीय मित्रावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती डायघर पोलिसांनी रविवारी दिली.

Thane: A schoolgirl was molested by her friend on the pretext of love affair, revealed after the girl became pregnant | Thane: प्रेमसंबंधाच्या बहाण्यातून शाळकरी मुलीवर मित्राकडून अत्याचार, मुलगी गर्भवती राहिल्यानंतर झालं उघड

Thane: प्रेमसंबंधाच्या बहाण्यातून शाळकरी मुलीवर मित्राकडून अत्याचार, मुलगी गर्भवती राहिल्यानंतर झालं उघड

- जितेंद्र कालेकर

ठाणे - एका १२ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिच्याच एका १६ वर्षीय मित्रावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती डायघर पोलिसांनी रविवारी दिली. पीडित मुलगी अडीच महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील अल्पवयीन आरोपीला भिवंडीच्या बाल न्यायालयात पाठविण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

डायघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी डायघर भागातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला अल्पवयीन मुलगाही याच भागातील एका शाळेत जातो. या दोघांची एकमेकांशी गेल्या दोन वर्षांपासून चांगली मैत्री आहे. याच मैत्रीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. शाळेत जाण्याच्या बहाण्याने ते एकमेकांना भेटत असत. त्यांच्या या प्रकाराबद्दल दोघांचेही कुटुंबीय अनभिज्ञ होते. दोघांच्याही भेटीदरम्यान चार ते पाच महिन्यांपूर्वी या मुलाने तिच्याशी जवळीक साधत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मात्र, याची तिने कुटुंबीयांना कोणतीही माहिती दिली नाही.

तिच्या पोटात गेल्या काही दिवसांपासून दुखत होते, तसेच मासिक पाळीचाही त्रास होत असल्याने, तिला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी ती अडीच महिन्यांची गरोदर असल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्याकडे चौकशी केल्यानंतर, या प्रकाराची माहिती तिने कुटुंबीयांना दिली. हा प्रकार समजल्यानंतर कुटुंबाला धक्काच बसला. या मुलीच्या तक्रारीवरून या प्रकरणी ४ ऑगस्ट रोजी रात्री बलात्कारासह पॉक्सोअंतर्गत डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या मुलाला बाल न्यायालयात पाठविले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गावडे यांनी सांगितले.

Web Title: Thane: A schoolgirl was molested by her friend on the pretext of love affair, revealed after the girl became pregnant