Thane: सात चाळींमध्ये बाधल्या ९२ खोल्या, पाच जणांविरोधात पोलिसांनी दाखल केला गुन्हा
By सदानंद नाईक | Updated: March 19, 2025 18:06 IST2025-03-19T18:04:52+5:302025-03-19T18:06:34+5:30
-सदानंद नाईक, उल्हासनगर शहराशेजारील माणेरेगावात विनापरवाना ३४ गुंठयाच्या जागेत ७ चाळीत ९२ खोल्या बांधल्या प्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधीक्षक यांच्या ...

Thane: सात चाळींमध्ये बाधल्या ९२ खोल्या, पाच जणांविरोधात पोलिसांनी दाखल केला गुन्हा
-सदानंद नाईक, उल्हासनगर
शहराशेजारील माणेरेगावात विनापरवाना ३४ गुंठयाच्या जागेत ७ चाळीत ९२ खोल्या बांधल्या प्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधीक्षक यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एकूण पाच जणावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून शेकडो जणांचे संसार उघड्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उल्हासनगर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माणेरगाव हे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत येते. १५ सप्टेंबर २०२२ साला दरम्यान येथील ३४ गुंठे जमिनीवर बाळकृष्ण कान्हा भोईर, जयेश बाळकृष्ण भोईर, मुकेश शालिक भोईर, रमेश वंडार भोईर व अमर घोनसोळकर यांनी संगणमत करून विनापरवाना ७ चाळीत तब्बल ९२ खोल्या बांधल्या.
दरम्यान अवैध बांधकामाचे प्रकरण उघड झाल्यावर कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधीक्षक नितीन बबन चौधरी यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अवैध बांधकामाची तक्रार दिली. विठ्ठलवाडी पोलिसांनी एकूण पाच जाणावर विना परवाना अवैध बांधकाम बांधल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्हाने अवैध खोल्यात राहण्यास आलेल्या शेकडो जणांचा संसार उघड्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.