शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जीआर निघाला, थॅलेसेमिया, हिमोफेलिया रुग्णांनाही शिक्षण अन् नोकरीत आरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 22:31 IST

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत आणि राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशीही खासदार शिंदे यांनी पत्रव्यवहार केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने आता रक्तदोषामुळे येणाऱ्या

ठळक मुद्दे ·       राज्य सरकारने जारी केला शासन निर्णय ·       लोकसभेत उपस्थित केला होता मुद्दा ·       थॅलेसेमिया, हिमोफेलिया रुग्णांना मिळणार अपंगत्वाचे प्रमाणपत्र

ठाणे - केंद्र सरकारने अपंग व्यक्ती हक्क कायद्यान्वये अपंगत्वाचे विविध प्रकार निश्चित केले असून त्यांना विविध हक्क बहाल करण्यात आले आहेत, ज्यात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणदेखील ठेवण्यात आले आहे. परंतु, सदर कायद्यात थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकल सेल यांसारख्या रक्तदोषाने येणाऱ्या अपंगत्वाचा समावेश असूनही अशा व्यक्तींना अनेक सरकारी योजनांचा आणि आरक्षणाचा लाभ मिळत नाही. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ही बाब उपस्थित करून अशा अपंग व्यक्तींना आरक्षणाचा व अन्य योजनांचा लाभ देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. 

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत आणि राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशीही खासदार शिंदे यांनी पत्रव्यवहार केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने आता रक्तदोषामुळे येणाऱ्या अपंगत्वासहीत एकूण 21 प्रकारच्या अपंगत्वाने बाधित व्यक्तींना अपंगत्व प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. यूपीएससी परीक्षेसाठी फेब्रुवारी 2018 मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठीच्या नियमावलीत अपंग हक्क कायद्यान्वये निश्चित करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या अपंग व्यक्तींना अपंगांसाठी राखीव असलेल्या आरक्षणाचा लाभ घेता येईल, असे नमूद करण्यात आले होते. मात्र, ऑनलाईन अर्जात थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकल सेल आदी रक्तदोषाने बाधित अपंग व्यक्तींचा समावेशच नसल्याची बाब उघडकीस आल्यामुळे अशा व्यक्तींवर मोठा अन्याय होत असल्याची बाब खा. डॉ. शिंदे यांनी शून्य प्रहरात सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच, अनेक राज्यांमध्ये या रुग्णांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात येत नसल्यामुळे त्यांना सर्वच प्रकारच्या सरकारी लाभांपासून वंचित राहावे लागत असल्यामुळे राज्यांना केंद्र सरकारने आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली.

यासंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत आणि राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी पत्रव्यवहारकेला असता यूपीएससी सचिवांनी उत्तरादाखल पाठवलेल्या पत्रात कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयाने निश्चित केलेल्या नियमांनुसार परीक्षा घेतली जात असल्याचे म्हटले होते. त्यामुळे कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयाने याची दखल घेऊन रक्तदोष बाधित अपंगांनाही ही परीक्षा देण्याची संधी मिळावी, यासाठी नियमांमध्ये सुधारणा करावी, अशी मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली होती.

या प्रयत्नांना यश आले असून महाराष्ट्र सरकारने आता केंद्र सरकारच्या अपंग हक्क कायद्यान्वये निश्चित करण्यात आलेल्या सर्व, म्हणजे 21 प्रकारच्या अपंग व्यक्तींना अपंगत्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय 14 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयामुळे थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकल सेल आदी रक्ताधारित अपंग व्यक्तींनाही मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार असून त्यांना शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेreservationआरक्षणEducationशिक्षण