भिवंडीत घराला भीषण आग, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
By नितीन पंडित | Updated: February 24, 2024 20:47 IST2024-02-24T20:46:20+5:302024-02-24T20:47:12+5:30
मोठी दुर्घटना टळली आहे.

भिवंडीत घराला भीषण आग, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: महानगरपालिकेच्या हद्दीतील हाजी कंपाउंड येथे घराला अचानक शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेने परिसरात एकच धावपळ उडाली होती. सुदैवाने हे घर बंद असल्यामुळे या घरात कोणी राहत नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
हे घर नागरी वस्तीच्या मधोमध असल्याने परिसरात काही काळ धावपळ सुरू होती.नागरिकांनी सतर्क होऊन आजूबाजूच्या घरामध्ये ठेवण्यात आलेले तीन सिलेंडर नागरिकांनी काढल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले.मात्र तोपर्यंत या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले असून सुदैवाने या आगे मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.