शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

टीएमटीमधील सहा कोटींच्या घोटाळयाप्रकरणी आएएएस अधिकाऱ्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 7:12 PM

ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) ४७० प्रवासी बस थांब्यांच्या जागी बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा, या तत्वावर प्रवासी निवारे बांधून त्यावर जाहिरात प्रदर्शित करण्याच्या ठेक्यांमध्ये केलेल्या सहा कोटी ७३ लाख ५५ हजार ९४६ रुपयांच्या घोटाळयामध्ये तत्कालीन परिवहन व्यवस्थापक तथा विद्यमान सनदी अधिकारी अशोक करंजकर यांच्यासह दहा जणांविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) ४७० प्रवासी बस थांब्यांच्या जागी बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा, या तत्वावर प्रवासी निवारे बांधून त्यावर जाहिरात प्रदर्शित करण्याच्या ठेक्यांमध्ये केलेल्या सहा कोटी ७३ लाख ५५ हजार ९४६ रुपयांच्या घोटाळयामध्ये तत्कालीन परिवहन व्यवस्थापक तथा विद्यमान सनदी अधिकारी अशोक करंजकर यांच्यासह दहा जणांविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली असून याप्रकरणी चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.आगार व्यवस्थापक दिलीप कानडे, सेवानिवृत्त परिवहन व्यवस्थापक श्रीकांत सरमोकदम, सेवानिवृत्त परिवहन उपव्यवस्थापक कमलाकर दिक्षित, तत्कालीन मुख्य लेखापाल अजित निºहाळे (सेवानिवृत्त), परिवहनमधून बडतर्फ झालेले तत्कालीन वाहतूक अधीक्षक गुरुकुमार पेडणेकर, तत्कालीन लेखा परीक्षक (सेवानिवृत्त) पिटर पिंटो आणि सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत धुमाळ आदी आठ अधिकाऱ्यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. सनदी अधिकारी असलेले करंजकर हे सध्या कृषी उद्योग महामंडळामध्ये व्यवस्थापकीय संचालक आहेत. तर सोल्युशन्स अ‍ॅडर्व्हटायझिंगचे प्रविण सोलंकी आणि गुज्जू अ‍ॅडसचे व्यवस्थापकीय संचालक भावेश भिडे या दोन खासगी व्यक्तींचाही यात समावेश आहे.एसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २००८ ते २०१८ या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये ठाणे परिवहन सेवेतील तत्कालीन व्यवस्थापक करंजकर यांच्यासह आठ अधिकाºयांनी आपल्या अधिकाराचा आणि पदाचा दुरुपयोग करुन तसेच कट रचून सोलंकी आणि भिडे या दोघांसह इतरांच्या मदतीने टीएमटीच्या ४७० बस प्रवासी निवाºयांच्या मूळ जागी बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर निवारे बांधून त्यावर जाहिरात प्रदर्शनाचे हक्क देण्याबाबतचा ठेका मिळण्यासाठी टीएमटीकडून घेतलेल्या निविदा प्रक्रीयेत जॉइन्ट व्हेंचरची तरतूद नसतांनाही सोल्युशन अ‍ॅडव्हर्टायझिंग यांनी विश्वर पब्लीसिटी, झेनिथ आऊटडोअर आणि गुज्जू अ‍ॅड. प्रा. लि. या कंपन्यांची बनावट डिड तयार केली. याच कंपनीची तीन वर्षांच्या नफातोटा आणि ताळेबंदीबाबतची अपूर्ण कागदपत्रे जोडली. तरीही सोल्युशन यांना बेकायदेशीरपणे ठेका मिळवून दिला. अशा प्रकारे निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार करुन सोल्युशनला ठेका मिळाल्यानंतर दहा लाखांची इसारा रक्कम बेकायदेशीरपणे परत केली. अशाच वेगवेगळया प्रकारे सहा कोटी ७३ लाख ५५ हजारांचे टीएमटीचे आर्थिक नुकसान करुन तितकाच ठेकेदाराला फायदा करुन दिल्याने ठाणे एसीबीने १ मार्च २०२१ रोजी अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक माया मोरे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी