ठाण्यात पोकलेनच्या धक्क्याने दहा इंचाची जलवाहिनी फुटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 22:37 IST2021-03-15T22:34:21+5:302021-03-15T22:37:06+5:30
नौपाडयातील विष्णूनगर येथे पाणी पुरवठा विभागामार्फत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना जुनी जलवाहिनी खोदकाम करताना पोकलेनचा धक्का लागून सोमवारी सकाळी फुटली. फुटलेल्या दहा इंचाच्या जलवाहिनीमुळे लाखो लीटर पाणी वाया गेले. ही बाब जलवाहिनीचा पाणी पुरवठा सुरू झाल्यावर समोर आल्यानंतर तातडीने ते काम ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने हाती घेतले.

काही तासांनी पाणी पुरवठा सुरळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: नौपाडयातील विष्णूनगर येथे पाणी पुरवठा विभागामार्फत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना जुनी जलवाहिनी खोदकाम करताना पोकलेनचा धक्का लागून सोमवारी सकाळी फुटली. फुटलेल्या दहा इंचाच्या जलवाहिनीमुळे लाखो लीटर पाणी वाया गेले. ही बाब जलवाहिनीचा पाणी पुरवठा सुरू झाल्यावर समोर आल्यानंतर तातडीने ते काम ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने हाती घेतले. त्यानंतर दुपारच्या सुमारास कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहरातील नौपाडा परिसरातील विष्णूनगर येथे ठामपा पाणी पुरवठा विभागामार्फत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी पोकलेनच्या मदतीने खोदकाम सुरू आहे. हे काम सुरु असताना त्या पोकलेनचा धक्का भूमीगत असलेल्या दहा इंचाच्या जुन्या पाण्याच्या जलवाहिनीला बसला आणि ती जलवाहिनी सोमवारी सकाळच्या सुमारास फुटली. मात्र, जलवाहिनीमध्ये पाणी नसल्याने तातडीने तो प्रकार समजून आला नाही. पण, अर्धा एक तासाने पाणी पुरवठा सुरू झाल्यावर जलवाहिनी फुटल्याची बाब उघडकीस आली. यामुळे मोठया प्रमाणात पाणी वाहून गेल्याने या परिसरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. त्या फुटलेल्या जलवाहिनीचे काम तातडीने हाती घेण्यात आल्यानंतर दुपारच्या सुमारास त्या परिसरातील नागरिकांना कमी दाबाने पाणी सुरळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.