शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या प्रलोभनाने तरुणांची फसवणूक

By admin | Updated: October 26, 2016 05:22 IST

नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवून पूर्वेतील बाजीप्रभू चौकातील पाटकर बिल्डिंगमधील जीसीसी रिक्रूटमेंट या प्लेसमेंटमधील दुकलीने उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांकडून

डोंबिवली : नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवून पूर्वेतील बाजीप्रभू चौकातील पाटकर बिल्डिंगमधील जीसीसी रिक्रूटमेंट या प्लेसमेंटमधील दुकलीने उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांकडून हजारो रुपये उकळल्याचा आरोप शिवसेना शाखाप्रमुख संदीप नाईक यांनी केला आहे. याप्रकरणी नाईक यांनी या दुकलीला घेऊन रामनगर पोलीस ठाणे गाठले. मात्र, फसवणूक झालेल्यांपैकी कोणीही फिर्याद न दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.जीसीसी रिक्रूटमेंट या प्लेसमेंटमधील व्यवस्थापक हुमैर मोहमद कलीम खान आणि कृष्णा कुमार गुप्ता यांनी बँक, सुरक्षारक्षक, कॉलिंग बॉय, आॅफिस बॉय आदी पदांवर बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याची हमी जाहिरातीद्वारे दिली होती. त्यासाठी त्यांनी प्रत्येकी ६५० रु पये घेतले. पैसे भरूनही नोकरी न मिळाल्याने अनेक तरु णांनी पूर्वेतील शिवसेना मध्यवर्ती शाखेत धाव घेतली. त्यांनी सर्व प्रकार शाखाप्रमुख नाईक यांच्या कानावर हा प्रकार घातला. मात्र, तरुणांनी भीतीपोटी प्लेसमेंटचालक आणि पोलिसांसमोर जाण्यास नकार दिला. या फसवणुकीविरोधात नाईक यांनी बेरोजगार मुलांच्या वतीने प्लेसमेंट कार्यालय गाठून जाब विचारला. त्यावेळी हुमैर खान हिने आपले नाव सोनाली गुप्ता तर कृष्णाने राजू असे नाव सांगितले. त्यांनी खोटी नावे तसेच उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नाईक यांनी त्यांना रामनगर पोलीस ठाण्यात नेले. पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी या प्रकाराबाबत दुकलीला धारेवर धरत जाब विचारला. मात्र, फसगत झालेला एकही तरु ण पुढे आला नाही.फसवणूक झालेला एकही बेरोजगार तरुण पुढे न आल्याने गुन्हा दाखल न करता ‘जीसीसी रिक्रूटमेंट’च्या दुकलीला सोडून दिले आहे. मात्र, याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यात ते दोषी अढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. - विलास शेंडे, पोलीस निरीक्षक, रामनगर पोलीस ठाणेशिवसेना शाखेत संपर्क साधा‘जीसीसी रिक्रूटमेंट’मध्ये नोकरीसाठी पैसे भरलेल्या आणि ती न मिळाल्यामुळे फसवणूक झालेल्या तरुणांनी डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन शाखाप्रमुख संदीप नाईक यांनी केले आहे.