शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा
2
हमासनंतर आता हिजबुल्लाहनं उडवली इस्रायलची झोप, 250 रॉकेट डागले; मोठं युद्ध भडकण्याची शक्यता 
3
धक्कादायक! मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अचानक पैसे गायब; बँकेत घातला गोंधळ
4
Saudi vs USA: सौदी अरबने अमेरिकेला दिला ५० वर्षांतील सर्वात मोठा धक्का, प्रकरण काय?
5
अजित पवार गटासह शिंदेसेनेला ‘कॅबिनेट’? ‘एनडीए सरकार’चा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये
6
स्वबळाच्या डरकाळ्या! विधानसभेला मविआ, महायुतीचे समीकरण फिसकटणार? सर्वांकडून स्वतंत्र चाचपणी
7
भारत-पाकिस्तान क्रिकेट रद्द करा! उद्धवसेनेकडून पंतप्रधानांना पाठविले पत्र
8
सेहवागनं लायकी काढली! पण शाकिबनं स्फोटक खेळी करताच रूबाब दाखवला, म्हणाला...
9
AFG vs PNG : अफगाणिस्तानचा विजयरथ कायम! सुपर-८ मध्ये धडक; न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर
10
आजचे राशीभविष्य, १४ जून २०२४: आरोग्य उत्तम राहील, पण रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल!
11
"त्यानं भारताविरूद्ध जे केलं ते...", नसीम शाहच्या समर्थनार्थ पाकिस्तानी अभिनेत्री मैदानात!
12
'इंडस्ट्रीत एखाद्याच्या मागून....'; सिद्धार्थने सांगितली कलाविश्वातील खटकणारी गोष्ट
13
Kuwait Fire: आज भारतात आणणार मृतदेह, कोणत्या राज्यातील किती लोकांचा मृत्यू?
14
भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर
15
दहशतवादाचे कंबरडे मोडा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश; दहशतवादी घटनांचा घेतला आढावा
16
न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर! शाब्दिक युद्ध पेटलं; दिग्गजानं पाकिस्तानची लायकी काढली
17
पदवीधरमधील विजय अपप्रचाराचे बारा वाजवेल, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
18
भाजीपाल्याचा दुष्काळ: फरसबी, वाटाण्यासह दोडका १६० रुपये किलो, गवार, शेवग्यानेही ओलांडली शंभरी
19
'करा किंवा मरा'च्या सामन्यात इंग्लंडचा 'मोठ्ठा' विजय; अवघ्या १९ चेंडूत सामना जिंकला
20
'घरातील काम ही फक्त महिलांची जबाबदारी का?' लोकप्रिय अभिनेत्री सान्या मल्होत्राचा सवाल

खातीवलीच्या सुर्ष्टी फार्म हाऊसवर तहसीलदारांची कारवाई, ठोठावला 50 हजारचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 5:32 PM

Tehsildar takes action against Khatiwali's Surshti Farm House : शासन निर्णयानुसार, सुर्ष्टी फार्म हाऊस खातीवलीच्या मालकास शहापूर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी 50 हजाराचा दंड ठोठावला असून पुढच्या वेळी नियम बाह्य काम केल्यास फार्महाऊस सील करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

- शाम धुमाळ

कसारा : राज्यात कोरोनाने पुनःश्च डोके वर काढले असल्याने राज्य शासनाने हॉटेल, रिसॉर्ट, विवाह कार्यालय, धार्मिक स्थळ या ठिकाणासाह सार्वजनिक ठिकाणी कडक निर्बंध लावले आहेत. ठिकठिकाणी नियम लागू करीत, नियमांचे पालन न करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाईचे आदेश स्थानिक प्रशासनास दिले आहेत. (Tehsildar takes action against Khatiwali's Surshti Farm House, fined Rs 50,000)

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहापूर तालुक्यातील खातीवली वाशिंद येथील व भातसा नदी पात्रा लगत असलेल्या सुर्ष्टी फार्म हाऊसवर शहापूरच्या तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण यांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली.

खातीवली येथील सुर्ष्टी फार्म हाऊसवर सुरु असलेल्या होळी पार्टीत शासनाचे नियम पायदळी तुडवत विना मास्क, सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत शंभरहुन अधिक लोकांनी गर्दी केली होती. पार्टी साठी आलेल्या गर्दीत मोठया प्रमाणात आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमांची पायमली होत असल्याचे निदर्शनात आल्यावर ही कारवाई करण्यात आली.

शासन निर्णयानुसार, सुर्ष्टी फार्म हाऊस खातीवलीच्या मालकास शहापूर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी 50 हजाराचा दंड ठोठावला असून पुढच्या वेळी नियम बाह्य काम केल्यास फार्महाऊस सील करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या कारवाई पथकात, नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण, तलाठी रुपेश  मेरठ, मिलिंद राऊत सहभागी झाले होते. दरम्यान तहसीलदारांच्या धडक कारवाईमुळे हॉटेल, रिसॉर्ट, फार्म हाऊस, चालकांचे धाबे दणाणले आहेत.

शहापूर तालुक्यातील हॉटेल, रिसॉर्ट, दुकानदारयांनी राज्य शासनाचे नियम  पाळून प्रशासनास  सहकार्य करावे जाणसामान्यांनी देखील मास्क चा वापर करून गर्दी करणे टाळावे, दरम्यान नियम तोडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.-  निलिमा सूर्यवंशीतहसीलदार, शहापूर

टॅग्स :thaneठाणेShahapurशहापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस