शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

‘टीडीसी’ला३ कोटींचा चुना लावणारा अटकेत!

By admin | Updated: February 21, 2016 02:42 IST

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये सर्वात श्रीमंत बँक असा नावलौकिक प्राप्त केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (टीडीसी) ३५ गाड्यांच्या कर्ज व्यवहारात एजंटने

- सुरेश लोखंडे,  ठाणे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये सर्वात श्रीमंत बँक असा नावलौकिक प्राप्त केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (टीडीसी) ३५ गाड्यांच्या कर्ज व्यवहारात एजंटने सुमारे तीन कोटी रुपयांचा चुना लावल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. बनावट कागदपत्रांसह वाहनांच्या चाव्या दाखवून घेतलेल्या कर्जातून प्रत्यक्षात गाड्या खरेदीच केलेल्या नसल्याचे उघड झाले आहे. या फसवणुकीकरिता एकास ताब्यात घेण्यात आल्याने बँकेच्या मुख्यालयात खळबळ उडाली आहे. या बँकेवर राष्ट्रवादी काँगे्रसची सत्ता आहे. एनसीपी आणि बहुजन विकास आघाडीचे या बँकेवर अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष आहेत. बँकेने गरजू व्यक्तींना गाड्या खरेदीसाठी एजंटमार्फत केलेला कर्जपुरवठा आणि त्यातून बँकेच्या झालेल्या फसवणुकीच्या या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. सुमारे ३५ महागड्या गाड्यांसाठी टीडीसी बँकेने एजंटमार्फत सुमारे तीन कोटी रुपये कर्जपुरवठा केला. त्यासाठी देण्यात आलेले कर्ज प्रस्ताव, गाड्या खरेदीची कागदपत्रे, आरटीओ पासिंग सर्टिफिकेट, गाड्यांच्या चाव्या हे बोगस असल्याचे कर्ज वितरणानंतर बँकेच्या लक्षात आले. कर्जाचे हप्ते वसूल करताना हा घोटाळा उघड झाला. सर्व बाजूंनी शहानिशा केल्यानंतर बँकेने एजंटचा शोध सुरू केला असता त्यास शनिवारी शिताफीने ताब्यात घेतले. शनिवारी दुपारी त्यास बँकेच्या मुख्य कार्यालयात आणून बँक अध्यक्ष बाबाजी पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वकील यांच्या समक्ष डोंबिवलीच्या लोढा हेवन शाखेच्या व्यवस्थापकांनी हजर केले. त्यानंतर, त्यास अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे हजर केल्याचे सांगण्यात आले. गाड्यांसाठी घेतलेल्या कर्जातून त्याने गाड्याच खरेदी केल्या नसल्याचे सांगितले जात आहे. सुमारे ३५ गाड्यांच्या या घोटाळ्यात बँकेला अंदाजे तीन कोटी रुपयांचा फटका बसल्याची चर्चा बँक संचालकांमध्ये सुरू आहे. याआधीदेखील बनावट सोने गहाणप्रकरणी बँकेला मोठ्या रकमेचा भुर्दंड पडला होता.बँकेची सुमारे २७ गाड्यांच्या कर्जप्रकरणात फसवणूक झाली असून त्यापैकी सात गाड्यांच्या कर्ज फसवणूक प्रकरणात लोढा हेवन येथील बँकेच्या शाखेकडून २१ मे २०१४ ला गुन्हा दाखल झाला होता. त्यातील एक आरोपी फरार होता. त्याला आज ताब्यात घेण्यात आले आहे. त्या प्रकरणात बँकेची सुमारे ७६ लाखांची फसवणूक झालेली होती. ताब्यातील या आरोपीकडून आता सर्व प्रकरणाची उकल होणार आहे. याआधीदेखील या आरोपीने एका मोठ्या बँकेची सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक केली होती.- बाबाजी पाटील, अध्यक्ष टीडीसी बँक