उल्हासनगरात स्कुटीला हायवाची धडक, मोठ्या भावाचा मृत्यू तर लहान जखमी, सुदैवाने वडील वाचले
By सदानंद नाईक | Updated: October 18, 2025 16:18 IST2025-10-18T16:18:07+5:302025-10-18T16:18:17+5:30
Accident In Ulhasnagar: कॅम्प नं-१ मुरबाड रस्त्यावर शुकवारी सायंकळी ५ वाजता टाटा हायवा गाडीचा स्कुटीला धक्का लागून १८ वर्षाच्या तरुणाचा चिरडून मृत्यू झाला. तर लहान भाऊ जखमी झाला. सुदैवाने वडील वाचले असून वाहन चालकावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगरात स्कुटीला हायवाची धडक, मोठ्या भावाचा मृत्यू तर लहान जखमी, सुदैवाने वडील वाचले
- सदानंद नाईक
उल्हासनगर - कॅम्प नं-१ मुरबाड रस्त्यावर शुकवारी सायंकळी ५ वाजता टाटा हायवा गाडीचा स्कुटीला धक्का लागून १८ वर्षाच्या तरुणाचा चिरडून मृत्यू झाला. तर लहान भाऊ जखमी झाला. सुदैवाने वडील वाचले असून वाहन चालकावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-१, शहाड मुरबाड रस्त्यावरून किरण परशुराम चव्हाण हे तनिष व पियुष या मुलासह स्कुटी गाडीवरून शुक्रवारी दुपारी ४ वाजता घरी कल्याण येथे जात होते. यावेळी भरधाव आलेल्या टाटा हायवा गाडीने स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात १८ वर्षाच्या तनिष याचा चिरडून जागीच मृत्यू झाला. तर १६ वर्षाचा पियुष गंभीर जखमी झाला. सुदैवाने किरण चव्हाण हे अपघातातून वाचले. शहरांत तिघे बापलेक खरेदी करण्यासाठी आल्याचे बोलले जाते. या अपघात प्रकरणी टाटा हायवा गाडीचे चालक याच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून शहाड पुलाच्या दूरस्ती व मुरबाड रस्ता दूरस्तीचे काम जलद होण्याची मागणी स्थानिकांकडून होऊ लागली आहे.