शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

तानसा धरण भरले; तर मोडकसागर भरण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 06:15 IST

जिल्ह्यात सरासरी १४६ मिमी पाऊस : ३३ गावांना सतर्कतेचा इशारा, बारवीची स्थितीही सुधारली

ठाणे : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील महानगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. यामुळे तानसा धरण भरल्याने तानसासह वैतरणा नदीकाठावरील ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांच्या कालावधीत एक हजार २७.९८ मिमी पाऊस पडला असून जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी नोंद १४६.८५ मिमी इतकी केली आहे.

तानसासह वैतरणा नदीवरील मोडकसागर धरण भरण्याच्या स्थितीत असल्यामुळे या दोन्ही नदीकाठांवरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा १० दिवसांपूर्वीच दिला होता. यानुसार, तानसा धरण गुरुवारी दुपारी २.३० वाजता भरून वाहू लागले. तानसा धरणाची गुरुवारी ४२१.९६ फूट पाण्याची पातळी होताच ते भरून वाहू लागले आहे.

मोडकसागर धरणाची ५२९.८५ फूट पाण्याची पातळी आहे. भातसा धरणात सध्या १२८.४८ मीटर पाण्याची पातळी तयार झाली आहे. तर, ठाणे जिल्ह्यास पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात ६६.६८ टक्के पाणीसाठा तयार आहे. तर, वाढीव पाणीसाठ्यानुसार बारवीत ४५.८७ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास काही दिवसांमध्ये अन्यही धरणे भरून वाहण्याची दाट शक्यता आहे.

तलावांमध्ये ५७ टक्के जलसाठामुंबई - तानसा तलाव भरुन वाहू लागल्याने पाण्याच्या चिंतेत असलेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही तलावात ४० टक्के जलसाठा कमी आहे. मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा सुरू राहण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे आवश्यक आहे. मात्र यावेळी पाऊस उशिरा आला, त्यामुळे तलावांमधील पाण्याची पातळी झपाट्याने खालावली. आजच्या घडीला तलावांमध्ये ५७ टक्के जलसाठा आहे. तर याच काळात गेल्या दोन वर्षांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक जलसाठा होता. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

मुंबईला दररोज तीन हजार ३८० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. तलावांमध्ये ५० टक्के जलसाठा जमा झाल्यानंतर मुंबईत गेली वर्षभर सुरू असलेली दहा टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी तुळशी तलाव भरून वाहिला होता. मात्र या तलावातून केवळ १८ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दररोज होत असतो. तानसा तलावातून दररोज ४५५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.

भिवंडीत सर्वाधिक पाऊसजिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात २०० मिमी, तर याखालोखाल उल्हासनगरमध्ये १७५, कल्याणला १५३, अंबरनाथला १५२.६०, शहापूरला १५० आणि ठाणे येथे १११ मिमी पाऊस पडला. सर्वात कमी मुरबाड तालुक्यात अवघा ८६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस