शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बैठक घेऊन तोडगा काढा; अन्यथा ७० कोटी भरा

By admin | Updated: January 13, 2017 06:44 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्तन येथील घनकचरा प्रकल्पाविरोधातील याचिकेवर १० जानेवारीला

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्तन येथील घनकचरा प्रकल्पाविरोधातील याचिकेवर १० जानेवारीला राष्ट्रीय हरित लवादाच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यात लवादाने पालिकेला पालघर व ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसह कोकण विभागीय आयुक्त व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) तज्ज्ञांसोबत ७ फेब्रुवारीपूर्वी बैठक घेऊन तोडगा काढा, अन्यथा ७० कोटी भरण्याची तयारी करा, अशी समज पालिकेला दिली.पालिकेने २००८ मध्ये धावगी-डोंगर येथे सुरू केलेला बीओटी तत्त्वावरील घनकचरा प्रकल्प बंद पडल्यानंतर सध्या उघड्यावर कचरा टाकला जात आहे. त्यावर प्रक्रिया होत नसल्याने त्यातील सांडपाणी व दुर्गंधीसह साठणाऱ्या कचऱ्याला सतत आग लागत असल्याने परिसरात धुराचे साम्राज्य पसरत आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. हा प्रकल्पच इतरत्र स्थलांतर करण्यासाठी ग्रामस्थांनी नागरी हक्क समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय हरित लवादाकडे मे २०१५ मध्ये याचिका दाखल केली. तत्पूर्वी पालिकेने हा प्रकल्प वसई तालुक्यातील सकवार येथे स्थलांतरित करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली. त्यासाठी पालिकेने जिल्हा प्रशासनाकडे ७२ लाखांची रक्कमही जमा केली. परंतु, जागेच्या सातबाऱ्यावर अद्याप पालिकेचे नाव आलेले नाही. त्यातच ही जागा वन विभागांतर्गत येत असल्याने त्याला विभागाने अद्याप परवानगी दिलेली नाही. याठिकाणी पालिकेला बीओटी तत्त्वावर वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू करायचा असला, तरी सकवार ग्रामस्थांनी त्याला विरोध दर्शवला आहे. यामुळे स्थलांतराच्या कोंडीत सापडलेल्या प्रकल्पासाठी सौराष्ट्र एनव्हायर्नमेंट या एकमेव कंपनीने निविदा भरली आहे. त्यासाठी पालिकेने कंपनीकडून ५० लाखांची बँक गॅरंटी घेतली असून प्रत्येक टन कचऱ्यामागे ७०० रुपये निश्चित केले आहे. तसेच लवादाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सध्याच्या प्रकल्पातील कचऱ्यावर ठोस प्रक्रिया केलेली नाही.त्यामुळे लवादाने पालिकेला चांगलेच फैलावर घेतले. एमपीसीबीने कचरा साठवण्याची परवानगी दिली का, असे विचारले असता त्यावर नाही, असे उत्तर येताच लवादाने घनकचरा प्रकल्प कचरा साठवण्यासाठी नाही, तर त्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पालिकेने अद्याप कचऱ्यावर ठोस प्रक्रिया केली नसल्याने तो साठवला जात असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आणून दिले. यावर, आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी आपण स्वत: त्यावर नियंत्रण ठेवून प्रकल्पातील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही लवादाला दिली. परंतु, लवादाने त्यात अपयश आल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करून त्यासाठी ७० कोटी भरण्याच्या दिलेल्या निर्णयानुसार पालिकेने त्याची तयारी करावी. याखेरीज, दुसरा उपाय नसल्याचे स्पष्ट केले. यावर, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनीही सहमती दर्शवली. यानंतरही पालिकेला आणखी एक संधी देण्याच्या उद्देशाने विविध सरकारी यंत्रणांतील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यात सकारात्मक तोडगा काढण्याची सूचना लवादाने केली. तसेच याचिकेवरील अंतिम निकाल राखून ठेवत पुढील सुनावणी ७ फेब्रुवारीला होणार असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)