शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

तान्ह्या बाळाला विकण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:09 IST

अवघ्या सहा दिवसांच्या बालकाच्या विक्रीचा डाव सोमवारी रात्री पोलिसांनी उधळून लावत तीन तासांत त्या बालकाची चारजणांच्या टोळक्याकडून सुटका केली. एखाद्या चित्रपटाच्या थरारक कथानकासारखी ही घटना असून आरोपींना जेरबंद करण्याकरिता

ठाणे: अवघ्या सहा दिवसांच्या बालकाच्या विक्रीचा डाव सोमवारी रात्री पोलिसांनी उधळून लावत तीन तासांत त्या बालकाची चारजणांच्या टोळक्याकडून सुटका केली. एखाद्या चित्रपटाच्या थरारक कथानकासारखी ही घटना असून आरोपींना जेरबंद करण्याकरिता पोलिसांनी वेषांतर करुन कुणी वेटर झाला तर कुणी ग्राहक झाला. दोन लाखांचा सौदा पूर्ण करण्याकरिता नोटांच्या आकाराचे कोरे कागद घेऊन नोटांची बंडले तयार केली गेली.पाच वर्षाच्या मुलीच्या विक्रीसाठी आलेल्या एका महिलेला अलीकडेच भिवंडीत याच पथकाने अटक केली होती. जुलै महिन्यात मूल विक्रीची ही दुसरी घटना घडली. दोन लाखांच्या मोबदल्यात ६ दिवसांच्या नवजात बालकाची विक्री करण्यासाठी ‘सना सय्यद नावाची महिला’ गिºहाईक शोधत असल्याची खबर ठाणे शहर सह-पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांना मिळाली. ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या पथकाने बोगस ग्राहक तयार करून त्या महिलेला ठाण्यातील एका हॉटेलमध्ये बोलवून घेतले. त्या ग्राहकाने आपल्याला चार मुली आहेत. पण, मुलगा नसल्याने हे मूल खरेदी करण्याची तयारी दाखवली. मात्र दोन लाखांची मागणी जास्त असल्याने तडजोड करण्याची विनंती केली.मात्र, ती महिला दोन लाखांवर ठाम राहिल्याने पोलिसांना तातडीने दोन लाखांची जुळवाजुळव करणे भाग होतो. कोºया कागदांच्या वर-खाली नोटा ठेवून नोटांची बंडले तयार केली गेली. त्या महिलेला संशय येऊ नये यासाठी पोलिसांनी वेषांतर करुन कुणी हॉटेलात वेटर झाला तर कुणी सफाई कर्मचारी. मुंब्य्रातील सना रुल आमिन सय्यद (३२), सना कुट्टुस शेख (२२) आणि सादिक इक्बाल खान (२०) तसेच रोहित लक्ष्मण स्वामी उर्फ साहिल सय्यद (२२) हे बालकाच्या विक्रीकरिता आले असता चौघांना अटक करून त्या बालकाची सुटका केली.या बालकाची रवानगी डोंबिवलीतील जननी आशिष या संस्थेत केली आहे. त्या आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर त्यांना ठाणे जिल्हा न्यायालयाने २९ जुलै रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.ही कारवाई, एएचटीसी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एस. बी. चव्हाण, के. व्ही. के. उपाळे, सहा पोलीस उपनिरीक्षक आर. जे. महाले, पोलीस हवालदार तानाजी वाघमोडे, अविनाश बाबरेकर, विजय पवार, बडगुजर, पोलीस नाईक भोईर, कारंडे यांनी केली.