१०१ वर्षांच्या आजीसोबत १० हजार ६२२ विद्यार्थ्यांनी घातले सूर्यनमस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 15:30 IST2020-02-01T15:30:01+5:302020-02-01T15:30:43+5:30
कल्याण : राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून पश्चिमेतील सुभाष मैदान येथे सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी सकाळी करण्यात आले ...

१०१ वर्षांच्या आजीसोबत १० हजार ६२२ विद्यार्थ्यांनी घातले सूर्यनमस्कार
कल्याण : राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून पश्चिमेतील सुभाष मैदान येथे सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी सकाळी करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कल्याण पूर्व आणि पश्चिममधील ५४ शाळांमधील १० हजार ६६२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या रत्नागिरी येथील १०१ वर्षांच्या आजी लक्ष्मीबाई दामले यांनीदेखील विद्यार्थ्यांसोबत सूर्यनमस्कार घातले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती, सुभेदार वाडा कट्टा आणि माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटना, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम महापौर विनिता राणे महिला व बालकल्याण समितीचे सभापती वीणा जाधव आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या उपस्थित संपन्न झाला.