शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सर्व्हेत ठामपा राज्यात प्रथम, तर देशात द्वितीय स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 3:12 AM

स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करत असलेल्या ठाणे महापालिकेला स्वच्छता अ‍ॅपचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागल्याचे चित्र होते.

ठाणे : स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करत असलेल्या ठाणे महापालिकेला स्वच्छता अ‍ॅपचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागल्याचे चित्र होते. परंतु आता ताज्या सर्वेक्षणानुसार ठाणे महापालिकेने या अ‍ॅपच्या सर्वेक्षणात बाजी मारून राज्यात पहिला, तर देशात दुस-या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.आजघडीला ठाणे महापालिकेच्या या स्वच्छता अ‍ॅपवर ४७ हजार ५८७ नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. तर, यातील १४ हजार ३२८ नागरिक हे त्यात अ‍ॅक्टिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. अ‍ॅक्टिव्ह असलेल्यांची संख्या कमी असली तरीदेखील पालिकेने मात्र या अ‍ॅपच्या सर्व्हेत केवळ एका महिन्यातच २७ वरून थेट राज्यात क्रमांक-१ पर्यंतची, तर देशात दुसºया क्रमांकापर्यंतची आता येत्या काही दिवसांत देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेऊ, असा विश्वास ठाणे महापालिकेने व्यक्त केला आहे.स्वच्छता अ‍ॅपच्या बाबतीत उदासीन धोरण राबवणाºया ठाणे महापालिकेला या अ‍ॅपबाबत ठाणेकरांनी अल्प प्रतिसाद दिल्याची माहिती डिसेंबरच्या अखेरीस समोर आली होती. डिसेंबरअखेरपर्यंत ४० हजार नागरिकांची नोंदणी अपेक्षित असताना हे अ‍ॅप केवळ २४ हजार नागरिकांनीच डाउनलोड केले होते. परंतु, डिसेंबरअखेरची तारीख ३१ जानेवारी केल्यानंतर या कालावधीत आतापर्यंत तब्बल ४७ हजार ५८७ नागरिकांनी ते डाउनलोड केले आहे. जर ४० हजार नागरिकांनी ते डाउनलोड केले, तर १५० गुण ठाणे महापालिकेला मिळणार आहेत. आता त्यापलीकडे महापालिकेने उडी घेतली आहे. जनाग्रह अ‍ॅपच्या जनजागृतीसाठी विशेष कर्मचारी नियुक्त केले आहेत.त्यानुसार, ६ फेब्रुवारीपर्यंत हे अ‍ॅप डाउनलोड करणाºयांचा आकडा ४७ हजार ५८७ एवढा झाला असून त्याचा वापर करणाºयांची संख्या १४ हजार ३२८ एवढी आहे. तर, ३३ हजार २५९ नागरिकांनी केवळ डाउनलोड केले आहे. त्यावर आलेल्या दोन लाख एक हजार ४०५ तक्रारींपैकी तब्बल एक लाख ९९ हजार ८३७ तक्रारींचे निवारण पालिकेने केले आहे, तर एक हजार ५१६ तक्रारी रद्द केल्या आहेत.या अ‍ॅपमुळे ५६ हजार ७५८ पैकी ५५ हजार ६७६ नागरिकांनी पालिकेने केलेल्या कामाप्रती समाधान व्यक्त केले असून केवळ ७७२ नागरिकांनी असमाधान व्यक्त केले आहे. समाधान व्यक्त करणाºयांची टक्केवारी ९८.१ टक्के एवढी आहे. यामुळेच २० डिसेंबर रोजी पालिका या अ‍ॅपच्या सर्व्हेत सत्ताविसाव्या क्रमांकावर होती. आज तीच पालिका राज्यात प्रथम स्थानी तर देशात क्रमांक दोनवर आली आहे. थोड्याच दिवसांत आम्ही पहिल्या क्रमांकावर जाऊ, असा विश्वासही पालिकेने व्यक्त केला आहे.६ फेब्रुवारीपर्यंत हे अ‍ॅप डाउनलोड करणाºयांचा आकडा ४७ हजार ५८७ एवढा असून त्याचा वापर करणाºयांची संख्या १४ हजार ३२८ एवढी आहे. तर, ३३ हजार २५९ नागरिकांनी केवळ डाउनलोड केले आहे. त्यावर आलेल्या दोन लाख एक हजार ४०५ तक्रारींपैकी तब्बल एक लाख ९९ हजार ८३७ तक्रारींचे निवारण पालिकेने केले आहे, तर एक हजार ५१६ तक्रारी रद्द करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :thaneठाणे