Mumbai Local: अचानक लोकल ट्रेनमध्ये मोबाईलचा स्फोट; प्रवाशांमध्ये गोंधळ सुरू झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 10:18 IST2025-02-11T09:57:42+5:302025-02-11T10:18:10+5:30

ठाणे जिल्ह्यात लोकल ट्रेनच्या महिला डब्यात एका अज्ञात प्रवाशाच्या मोबाईल फोनचा स्फोट झाला. त्यामुळे ट्रेनमधील प्रवासी घाबरले आणि गोंधळ उडाला.

Suddenly, a mobile phone exploded in a local train; Confusion started among the passengers | Mumbai Local: अचानक लोकल ट्रेनमध्ये मोबाईलचा स्फोट; प्रवाशांमध्ये गोंधळ सुरू झाला

Mumbai Local: अचानक लोकल ट्रेनमध्ये मोबाईलचा स्फोट; प्रवाशांमध्ये गोंधळ सुरू झाला

Mobile Explodes in Mumbai Local: कल्याणकडे जाणाऱ्या लोकलच्या महिलांच्या डब्यात सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास एका महिलेच्या पर्समधील मोबाइलचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे लोकलच्या डब्यात आग लागून धूर पसरला आणि काही काळासाठी प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

'पाकिस्तानशी चर्चा करणे कठीण, मोदी सरकारच्या समर्थनार्थ शशी थरूर; म्हणाले, "आपण २६/११ विसरू शकत...

कळवा स्थानकात ही घटना घडली. या घटनेमुळे घबराट उडाली. परंतु मोटरमनच्या केबिनमधील गार्डने प्रसंगावधान राखत अग्निरोधकाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर लोकल कल्याणकडे रवाना झाली.

या प्रकरणी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. सोमवारी रात्री ८.१२ वाजता कळवा स्थानकावर सीएसएमटी-कल्याण उपनगरीय ट्रेनमध्ये मोबाईल फोनचा स्फोट झाला. त्यामुळे ट्रेनमध्ये गोंधळ उडाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या अहवालानुसार, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनेनंतर ट्रेनमध्ये गोंधळ उडाला. तसेच, स्फोटामुळे धूरही पसरला. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक यंत्रांचा वापर केला.

ट्रेनमध्ये असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ट्रेनमध्ये मोबाईल फोनचा स्फोट झाल्यामुळे स्फोट झाला, यामुळे डब्यातील सगळेच घाबरले. या स्फोटामुळे डब्बामधून धूर झाला.यामुळे अनेक प्रवासी उतरण्यासाठी दरवाजाकडे धावले. यावेळी लगेच रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

पोलिसांनी सांगितले की,ज्या महिलेचा मोबाईल फोन स्फोट झाला त्यांची ओळख अजूनही पटलेली नाही. घटनेची चौकशी सुरू आहे. बॅटरीमधील काही बिघाडामुळे स्फोट झाला असावा.

Web Title: Suddenly, a mobile phone exploded in a local train; Confusion started among the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.