शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

खासगी रुग्णालयाची 'वाटमारी' रोखण्यासाठी मनसेने सुरु केलेल्या लढ्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 4:38 PM

कोरोना रुग्णांचे बिल आता लेखापरिक्षक तपासणार आहे.

ठळक मुद्देखासगी रुग्णालयाची 'वाटमारी' रोखण्यासाठी मनसेने सुरु केलेल्या लढ्याला यशकोरोना रुग्णांचे बिल आता लेखापरिक्षक तपासणारस्वस्तिक हॉस्पिटल' लुटमार प्रकरणानंतर ठाणे पालिका प्रशासनाला जाग -

ठाणे : कोरोना उपचारानंतर अवाजवी बिल देत गोरगरिब रुग्णांचे खिसे कापणार्‍या खासगी रुग्णालयांना आता चाप बसणार आहे. आठवड्याभरापूर्वी 'स्वस्तिक हाॅस्पिटल'ने रुग्णाची लुटमार केल्याच्या गंभीर प्रकरणाला मनसेने वाचा फोडल्यानंतर पालिका प्रशासनाने कोरोना रुग्णांचे बिल योग्य पध्दतीने तपासण्यासाठी थेट लेखापरिक्षकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयाची 'वाटमारी' रोखण्यासाठी मदत होणार असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.

        कोरोना लढ्यात एकीकडे राज्यशासन 'तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो' अशी भावनिक साद नागरिकांना घालत असताना ठाण्यात माञ या उक्तीच्या विरोधात जात काही खासगी रुग्णालय व मेडिकल चालकांनी सर्वसामान्य रुग्णांची लूट सुरु केली आहे. कोरोनाच्या उपचारादरम्यान रुग्णालय प्रशासन वापरत असणारे पीपीई कीट थेट तिप्पट दराने रुग्णांच्या माथी मारले जात असल्याच्या  स्वस्तिक हॉस्पिटलच्या गलथान कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी आवाज उठवला होता. रुग्णाच्या नातेवाईकांनी पाचंगे यांच्याकडे त्यांची व्यथा मांडताच या प्रकरणी पालिका आणि एफडीए विभागाकडे पाचंगे रितसर तक्रार दाखल केली होती. रुग्णालय प्रशासनाचा बिलांबाबतचा गलथानपणा रोखा, अशी विनंती संदीप पाचंगे यांनी ठाणे पालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांची भेट घेत केली होती. त्यानुसार तात्काळ पालिका प्रशासनाने १५ कोविड रुग्णालयांकडून रुग्णांना दिल्या जाणार्‍या बिलांचे लेखापरिक्षण करण्यासाठी ८ कनिष्ठ लेखापरिक्षकांची नेमणूक केली. सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णांच्या बिलांबाबत ठरवून दिलेल्या निकषांनुसार बिल रुग्णालय प्रशासनाने दिले का, यावर या टीमची करडी नजर राहणार आहे. दैनंदिन किमान १०० बिलांची तपासणी पुर्ण करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने या लेखापरिक्षकांना दिले आहेत.--------------------------------------------* अर्धी लढाई जिंकली...पुढील टप्पा लवकरच*खासगी रुग्णालय व मेडिकलच्या लुटीच्या जाचातून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची या निर्णयानंतर काही प्रमाणात निश्चितच सुटका होण्यास मदत होईल. माञ त्याहीपुढे जात मनसेकडून प्रक्रियेत सुसुञता आणण्यासाठी अॅपची निर्मिती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच पालिका प्रशासनाला या अॅपची माहिती देऊन पुढील लढाई जिंकण्यास बळ दिले जाणार आहे.- संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष,  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष , ओवळा माजिवडा विधानसभा

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याMNSमनसे